शेअर बाजार उघडण्यापूर्वी 'या' पॉवर स्टॉकवर लक्ष ठेवा, कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Vikram Solar Marathi News: भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक असलेल्या विक्रम सोलर लिमिटेडला महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. महाजेनकोच्या १५० मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी सोलर मॉड्यूल पुरविण्याची महत्वपुर्ण ऑर्डर मिळाल्याची घोषणा कंपनीने केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) प्रकल्प 2.0 अंतर्गत MAHAGENCO ला महाराष्ट्र राज्यातील जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मॉड्यूलचा पुरवठा केला जाईल.
या धोरणात्मक ऑर्डरमुळे उच्च-कार्यक्षमता सौर मॉड्यूलची कंपनीच्या प्रकल्प पोर्टफोलिओमध्ये भर पडणार आहे. या ऑर्डरमुळे भारतातील मान्यताप्राप्त मॉडेल्स आणि उत्पादकांच्या यादीत (एएलएमएम) प्रमुख कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या विक्रम सोलरचे स्थान आणखी बळकट झाले आहे.
कंपनी १५० मेगावॅट क्षमतेच्या प्रगत एन-टाइप मॉड्यूलचा पुरवठा करणार आहे. हे मॉड्युल त्यांच्या उच्च कामगिरी आणि ऊर्जा उत्पादनासाठी ओळखले जाते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) प्रकल्प २.० अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये महाजेनकोच्या प्रकल्पांना हे मॉड्यूल पुरवले जाणार आहेत.
तसेच या ऑर्डरअंतर्गत मॉड्यूलचे वितरण आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राची अक्षय ऊर्जा क्षमता वाढणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरणीय शाश्वततेतही आणखी भर पडेल, अशी आशा आहे.
विक्रम सोलरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. ज्ञानेश चौधरी यांनी सांगितले, ” आम्हाला ही ऑर्डर मिळाल्याचा खूप अभिमान आहे. उच्च-कार्यक्षमतेच्या सौर पर्यायाव्दारे हरित भारताला सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयात आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विक्रम सोलरवरील हा विश्वास एकप्रकारे गुणवत्ता, नावीन्य आणि शाश्वततेप्रती आम्ही दाखवत असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आम्ही आमची उपस्थिती आणखी सक्षम करत असताना आमच्या भागीदारांना आणि समुदायांना मूल्य आणि उत्कृष्टता प्रदान करण्यावर आमचे लक्ष केंद्रीत झालेले आहे. अक्षय ऊर्जेच्या क्षमतेत वेगाने भर टाकणारा तसेच उच्च-क्षमता असलेली बाजारपेठ या दृष्टीकोनातून आम्ही महाराष्ट्राकडे पाहतो. महाराष्ट्राच्या वाढत्या अक्षय ऊर्जेच्या मागणीबाबत आम्ही खूप आशावादी आहोत.”
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे प्रदेशाची अक्षय ऊर्जा क्षमता वाढेल, कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढेल अशी अपेक्षा आहे, असे कंपनीने म्हटले आहे.