'या' कारणांमुळे 18 टक्क्यांनी उसळला HDFC Life चा शेअर! खरेदी करावा का? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
HDFC Life Marathi News: एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२५ रोजी समाप्त झालेल्या वर्षासाठी स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारले आहेत. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत क्षेत्रापेक्षा अधिक झपाट्याने वाढ केली.
वैयक्तिक एपीईमध्ये प्रबळ १८ टक्के वाढीची नोंद केली, ज्याला विक्री करण्यात आलेल्या पॉलिसी, तिकिट आकार आणि संतुलित उत्पादन मिश्रणामध्ये वाढीचे पाठबळ मिळाले.
एकूण मार्केट शेअर (वैयक्तिक डब्ल्यूआरपी) आर्थिक वर्ष २५ च्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ७० बीपीएसने वाढून ११.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. खाजगी क्षेत्र मार्केट शेअर १५.७ टक्क्यांपर्यंत पोहोचले, ज्यामध्ये ३० बीपीएसची वाढ झाली.
नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) १३ टक्क्यांनी वाढून ३,९६२ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, ज्यामधून लाभदायी व्यवसायामधील प्रबळ वाढ दिसून येते.
एयूएम ३१ मार्च २०२५ रोजी ३,३६,२८२ लाख कोटी रूपये राहिले, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्क्यांची वाढ झाली.
१३ व्या व ६१ व्या महिन्याचे सातत्यता प्रमाण अनुक्रमे ८७ टक्के आणि ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचले. उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या ६१व्या महिन्याच्या सातत्यता प्रमाणामध्ये १००० बेसिस पॉइण्ट्सची मोठी सुधारणा झाली, यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्न होण्यासोबत त्यांना कायम ठेवण्याची क्षमता दिसून आली.
एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्ही) १७ टक्क्यांनी वाढून ५५,४२३ कोटी रूपयांवर पोहोचली, तसेच ईव्हीवरील कार्यरत परताव्यामध्ये १६.७ टक्क्यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्य निर्मिती दिसून आली.
आर्थिक वर्ष २५ च्या बारा महिन्यांमध्ये १,८०२ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्यात आला, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के वाढीची नोंद करण्यात आली, ज्याला आमच्या बॅक बुकमधील मिळालेल्या नफ्यामधील १८ टक्के वाढीची मदत झाली. आमच्या लाभांश देयक धोरणानुसार, संचालक मंडळाने प्रति शेअर २.१ रूपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे जवळपास ४५२ कोटी रूपयांचे पेमेंट होईल.
सॉल्वन्सी रेशिओ १९४ टक्के राहिले, जे नियामक थ्रेशोल्ड १५० टक्क्यांपेक्षा जास्त होते.
२०२५ मध्ये ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून प्रमाणित, ज्यामधून कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याप्रती कटिबद्धता दिसून येते. तसेच ग्रेट प्लेस टू वर्ककडून नाविन्यतेची संस्कृती घडवण्यासाठी टॉप ५० संस्थांमध्ये मान्यता मिळाली. एचडीएफसी लाइफला त्यांची सर्वसमावशेकता आणि कर्मचारी-अनुकूल धोरणांसाठी सन्मानित करण्यात आले, जसे बीएफएसआय क्षेत्रामध्ये बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया २०२४ पुरस्कारासह आणि अवतार अँड सेरामाऊंट यांच्याद्वारे एक्झिम्प्लर ऑफ इन्क्लुजन (मोस्ट इन्क्लुसिव्ह कंपनीज इंडिया २०२४) म्हणून सन्मानित करण्यात आले.
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, “आर्थिक वर्ष २५ मध्ये आम्ही आमची पोहोच अधिक वाढवली, आमच्या मूल्य तत्त्वांना अधिक दृढ केले आणि आमच्या व्यवसाय मॉडेलच्या दृढतेला दाखवले. आम्हाला वर्षासाठी आमच्या निर्धारित विकास महत्त्वाकांक्षांशी बांधील राहत आर्थिक वर्ष २५ साठी वैयक्तिक एपीईमध्ये १८ टक्के वाढीची नोंद करण्याचा आनंद होत आहे. आमचा एकूण उद्योग मार्केट शेअर ७० बीपीएसने वाढून ११.१ टक्क्यांपर्यंत आणि खाजगी क्षेत्रात ३० बीपीएसने वाढून १५.७ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
एपीईमध्ये २५ टक्के वाढीसह रिटेल प्रोटेक्शनने प्रबळ गती कायम राखली. सर्व माध्यमांनी दोन-अंकी वाढीची नोंद केली. आम्ही सर्वोत्तम डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करत आहोत, जेथे ९० टक्क्यांहून अधिक सर्विस विनंत्यांची आता सेल्फ-सर्विसच्या माध्यमातून हाताळणी केली जात आहे.
आम्ही आमच्या कार्यसंचालनाच्या २५व्या वर्षात प्रवेश करत असताना स्थिर नियामक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर क्षेत्राच्या टॉपलाइन वाढीला सातत्याने मागे टाकण्याची, एपीई वाढीच्या अनुषंगाने व्हीएनबी वाढ प्रदान करण्याची आणि दर ४ ते ४.५ वर्षांनी दुहेरी प्रमुख मेट्रिक्स मिळवण्याची आमची महत्त्वाकांक्षा कायम आहे.”