Kia India Spinny Partnership: किया इंडियाची स्पिनीसोबत भागीदारी! नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे

Kia India Spinny Partnership : ग्राहकांना कार अपग्रेड आणि खरेदी-विक्रीचा अधिक सुलभ अनुभव देण्यासाठी किया इंडियाने आघाडीच्या सेकंड-हँड कार प्लॅटफॉर्म 'स्पिनी'सोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे.
 नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे
नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे ( सौजन्य - सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • किया इंडियाची स्पिनीसोबत भागीदारी

  • नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे

  • ग्राहकांना कार अपग्रेड,खरेदी-विक्रीचा अधिक सुलभ अनुभव

Kia India Spinny Partnership : देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या किया इंडियाने आज भारतातील सर्वांत मोठ्या फुल-स्टॅक सेकंड-हँड कार प्लॅटफॉर्म स्पिनीसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. ग्राहकांचा कार अपग्रेड अनुभव अधिक सुलभ करणे आणि वाहन मालकीच्या संपूर्ण जीवनचक्रात अधिक मूल्य निर्माण करणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

 नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे
Best Tax Saving Investment : पैसेही वाढणार अन् इन्कम टॅक्सही वाचणार! या स्कीम्स देतात डबल फायदा

या भागीदारीअंतर्गत, जे ग्राहक स्पिनीच्या माध्यमातून आपले किया वाहन एक्सचेंज करतील आणि अधिकृत किया डीलरशिपवरून नवीन किया वाहन खरेदी करतील, ते किया इंडियाच्या प्रचलित कार्यक्रमांतर्गत एक्सचेंज लाभास पात्र ठरतील. विद्यमान वाहनातून अधिक मूल्य मिळवण्याची संधी ग्राहकांना देत, नवीन किया वाहनाकडे जाण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

उत्पादक कंपनीच्या खात्रीची अतिरिक्त हमी

या भागीदारीमुळे पूर्व-स्वामित्वाच्या (प्री-ओन्ड) किया वाहनांची परिसंस्थाही अधिक भक्कम होणार आहे. स्पिनीने खरेदी केलेल्या पात्र किया वाहनांची किया इंडियाच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेनुसार पाहणी केली जाईल. विहित प्रमाणन मानकांची पूर्तता करणाऱ्या वाहनांची “किया-सर्टिफाइड” बॅजसह विक्री केली जाईल आणि ती लागू असलेल्या ओईएम-समर्थित विस्तारित वॉरंटी लाभांसाठी पात्र असतील. त्यामुळे पूर्व-स्वामित्वाची किया कार खरेदी करताना ग्राहकांना उत्पादक कंपनीच्या खात्रीची अतिरिक्त हमी मिळेल. याशिवाय, आपल्या वाहनाचा डिजिटल पासपोर्ट रिपोर्ट असलेल्या ग्राहकांना स्पिनीला आपली किया कार विकताना रुपये ८,४०० पर्यंतचे अतिरिक्त लाभ मिळतील. किया कनेक्ट सदस्यांना ‘माय किया अ‍ॅप’द्वारे डिजिटल पासपोर्ट पाहता येईल.

ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने अपग्रेड करता येईल

या भागीदारीबाबत सेल्स अँड मार्केटिंगचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट श्री. अतुल सूद म्हणाले, “किया इंडियामध्ये आम्ही ग्राहक संबंधांकडे केवळ पहिल्या खरेदीपुरती मर्यादित न ठेवता, ती एक दीर्घकालीन प्रक्रिया मानतो. वाहन मालकीचे स्वरूप जसजसे बदलत आहे, तसतसा प्रत्येक टप्प्यावर अधिक सुविधा, पारदर्शकता आणि मूल्य देणारी परिसंस्था उभारण्यावर आमचा भर आहे. स्पिनीसोबतची आमची भागीदारी या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे; ज्यामुळे ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने अपग्रेड करता येईल आणि पूर्व-स्वामित्वाच्या किया वाहनांची परिसंस्थाही मजबूत होईल.”

अर्थपूर्ण एक्सचेंज लाभांची जोड

स्पिनीचे संस्थापक आणि सीईओ नीरज सिंह म्हणाले, “स्पिनीमध्ये आमचा विश्वास आहे की कार खरेदी करणे, विकणे आणि अपग्रेड करणे हा एक अखंड अनुभव असायला हवा. किया इंडियासोबतची आमची भागीदारी हा अनुभव साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकणारी आहे—ज्यामध्ये अर्थपूर्ण एक्सचेंज लाभांची जोड पात्र पूर्व-स्वामित्वाच्या वाहनांसाठी उत्पादक-समर्थित हमीशी दिली जात आहे.”

ही भागीदारी पूर्व-स्वामित्वाच्या किया कार खरेदी-विक्रीचा अनुभव अधिक समृद्ध करत, ग्राहक जीवनचक्र व्यवस्थापनाच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी देईल.

 नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे
Cheapest Gold Rate Across Indian : भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? या राज्यांची चर्चा; 22K, 24K वर आहेत आकर्षक ऑफर्स?