Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किवी जनरल इन्शुरन्सचा मोटर विम्यासह भारतात प्रवेश

किवी जनरल इन्शुरन्स ही भारतातील विमा अनुभवाला नव्याने परिभाषित करण्यासाठी उभारलेली डिजिटल-नेटिव्ह विमा कंपनी आहे. आज या कंपनीने 'युअर पीस, अवर पॉलिसी' या स्पष्ट तत्त्वज्ञानासह बाजारपेठेत आपल्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 05, 2026 | 08:42 PM
किवी जनरल इन्शुरन्सचा मोटर विम्यासह भारतात प्रवेश
Follow Us
Follow Us:

मुंबई, ५ जून २०२६: किवी जनरल इन्शुरन्स ही भारतातील विमा अनुभवाला नव्याने परिभाषित करण्यासाठी उभारलेली डिजिटल-नेटिव्ह विमा कंपनी आहे. आज या कंपनीने ‘युअर पीस, अवर पॉलिसी’ या स्पष्ट तत्त्वज्ञानासह बाजारपेठेत आपल्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. हे तत्त्वज्ञान ग्राहकांसाठी विमा प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि विश्वासार्ह बनवण्यावरील कंपनीच्या लक्ष्याला सादर करते. कंपनीने खाजगी कारसाठी मोटर इन्शुरन्सपासून आपल्या कामकाजाची सुरुवात केली आहे, जे फक्त प्रीमियमवर नव्हे तर क्लेम्सच्या सुलभतेवर केंद्रित करून डिझाइन केले गेले आहे.

उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्वे निलेश गर्ग आणि सौरव जयस्वाल यांनी स्थापन केलेल्या व वेस्टब्रिज कॅपिटलचे पाठबळ लाभलेल्या ‘किवी’ या कंपनीला मार्च २०२६ मध्ये नियामक मंजुरी मिळाली आहे. स्वतःच्या इन-हाउस तंत्रज्ञान यंत्रणेद्वारे सक्षम असलेल्या किवीची रचना ग्राहकांच्या जुन्या अडचणी दूर करण्यासाठी आणि अति-वैयक्तिकृत सोल्यूशन्स देण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीने पहिले व्यापक उत्पादन म्हणून ‘मोटर इन्शुरन्स’ची निवड केली आहे. क्लेमच्या संथ प्रक्रियेमुळे आणि आपले फायदे (उदा. बोनस) गमावण्याच्या भीतीने ग्राहक अनेकदा क्लेम दाखल करण्यास कचरतात. किवीचा मोटर इन्शुरन्स प्रत्‍यक्ष याच समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या क्लेम संदर्भातील सर्व चिंता दूर करण्यासाठी डिझाइन केला आहे.

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल …

किवी जनरल इन्शुरन्सचे संस्थापक निलेश गर्ग यांनी पद्धतशीर बदलाच्या गरजेवर भर दिला, ते म्‍हणाले , “विमा क्षेत्र बऱ्याच काळापासून अशा जुन्या प्रक्रियांनी वेढलेले आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीती निर्माण होते. तंत्रज्ञान, डेटा आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीचा वापर करून मूळ सिद्धांतांवरून याची पुनर्बांधणी करणे हे आमचे ध्येय आहे. आमचा भर विमा प्रक्रिया सोपी, जलद आणि सुसंगत करण्यावर आहे. किवीच्या माध्यमातून, आम्ही संस्था उभारत आहोत, ज्याच्यावर ग्राहक आणि भागीदार खरोखर विश्वास ठेवू शकतात. आमचे तत्त्वज्ञान, ‘युअर र पीस, अवर पॉलिसी,’मधून अधिक विश्वासार्ह विमा अनुभव तयार करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

किवी जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ, सौरव जयस्वाल म्हणाले, “आजचे ग्राहक विशेषतः महत्त्वाच्या क्षणांमध्ये स्पष्टता, वेग आणि विश्वासार्हतेची अपेक्षा करतात. किवीमध्ये आमचा भर प्रत्येक संवाद सोपा, जलद आणि अंदाज लावण्यायोग्य बनवण्यावर आहे. इन्स्टंट पॉलिसी जारी करणे आणि रिअल-टाइम क्लेम ट्रॅकिंगपासून ते जलद निर्णय आणि सिंगल-पॉइंट ओनरशिपपर्यंत प्रत्येक घटक अस्पष्टता कमी करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. मोटर इन्शुरन्सपासून सुरुवात करून विमा कशा प्रकारे प्रदान केला जातो याचा एक नवीन निकष स्थापित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्यासाठी, ‘युअर पीस, अवर पॉलिसी’ हे फक्त आमचे तत्त्वज्ञान नाही तर आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामागे आणि आम्ही डिझाइन करत असलेल्या प्रत्येक संवादामागील आमची कटिबद्धता आहे.”

Insurance Stocks: फक्त प्रीमियम पाहून खरेदी करू नका विमा कंपन्यांचे …

हे उत्पादन ग्राहकांच्या प्रत्यक्ष अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने उद्योग क्षेत्रातील पहिलीच नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सादर करत आहे. यातील ‘सुपर एनसीबी’ मुळे क्लेम दाखल केल्यानंतरही नो-क्लेम बोनस थेट शून्यावर न जाता डिस्काउंट स्केलवर केवळ एक पायदान खाली येतो, ज्यामुळे ग्राहक प्रमाणित रचनेपेक्षा ४० टक्क्यांपर्यंत जास्त सवलत मिळवू शकतात. तसेच, ‘फ्लेक्सी रिपेअर’ ग्राहकांना लहान-सहान नुकसान नोंदवून ठेवण्याची आणि नंतर मोठ्या क्लेमसोबत एकत्रित करण्याची सुविधा देते, जेणेकरून त्यांना प्रत्येक छोट्या क्लेमसाठी लागणारी अनिवार्य कपात (Deductibles) वारंवार भरावी लागणार नाही. त्वरित रोख मदतीसाठी यात ‘इन्स्टाकॅश’ ची सोय आहे, जी वाहन दुरुस्तीच्या दिवशीच पैसे थेट ग्राहकाच्या खात्यात ट्रान्सफर करते. याशिवाय, कंपनी ‘पेफर्स्ट’ देखील लाँच करत आहे, ज्याच्या माध्यमातून ग्राहक नेटवर्कबाहेरील आपल्या कोणत्याही विश्वसनीय गॅरेजमध्ये कार दुरुस्त करून त्वरित पेआउट मिळवू शकतात.

किवीचे हे काळजीमुक्त आश्वासन त्यांच्या वितरक नेटवर्कलाही लागू होते, जिथे डिजिटल ऑनबोर्डिंग आणि शेअर्ड क्लेम ट्रॅकर्सच्या मदतीने एजंट्सना प्रशासकीय अडथळ्यांशिवाय पूर्णपणे ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रित करता येते. विमा क्षेत्रातील गुंतागुंत आणि विलंब दूर करण्यासाठी किवीचे ऑपरेटिंग मॉडेल प्रगत तंत्रज्ञानाला मानवी सहकार्याची (हायब्रिड मॉडेल) जोड देते. इन्स्टंट पॉलिसी जारी करणे, रिअल-टाइम क्लेम ट्रॅकिंग आणि अडथळामुक्त पॉलिसी एंडोर्समेंट्स (बदल) यांसारखा याचा प्रत्येक घटक संपूर्ण जीवनचक्रात पारदर्शकता, वेग, सहानुभूती आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.

Web Title: Kiwi general insurance policy enters india market business sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Insurance

संबंधित बातम्या

Commonwealth Games 2026: निवा बूपा असणार ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’ची आरोग्य विमा प्रमुख भागीदार
1

Commonwealth Games 2026: निवा बूपा असणार ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’ची आरोग्य विमा प्रमुख भागीदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.