
Kotak Mahindra Bank Fraud: IDFC First नंतर आणखी एक धक्का; Kotak Bank मध्ये पंचकुला महापालिकेच्या FD चा घोटाळा
Kotak Mahindra Bank Fraud: आयडीएफसी फर्स्ट बँकेनंतर आता हरियाणातील एका खासगी बँकेकडून शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोटक महिंद्रा बँकेचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचकुला महानगरपालिकेत १६० कोटींच्या (एफडी) अपहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही सर्व रक्कम महापालिकेच्या मुदत ठेवींची आहे. पंचकुला महानगरपालिकेने विविध वेळी बँकेत एकूण १५० कोटींच्या एफडी केल्या होत्या, पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट खाती उघडून, संपूर्ण रक्कम त्यात हस्तांतरित केली आणि महानगरपालिकेला केवळ कागदपत्रे दाखवत फसवणूक केली. ही बाब पालिकेच्या अधिकाराच्या लक्षात देताच याची सखोल चौकशी करण्यात आली.
हे देखील वाचा: Aditya Birla OWND! Fashion Brand: मुंबईतील तरुणांसाठी नवे फॅशन डेस्टिनेशन; भारतात OWND! चे ७५ वे स्टोअर लाँच
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक लपवल्याचा आरोप
कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बराच काळ फसवणूक लपवून ठेवली आणि नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली, असा आरोप करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला आहे.
व बनावट विवरणपत्रे देखील दिली. कॉर्पोरेशनने ५८ कोटींच्या एफडीची मुदतपूर्तीची रक्कम खात्यात जमा करण्याची विनंती केली, तेव्हा प्रकरण उघडकीस आले. सध्या पंचकुला पालिकेकडून आणि कोटक महिंद्रा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची सखोल चौकशी करून अजून काही घोटाळे झाले आहेत का? याची तपासणी सुरू केली आहे.
हे देखील वाचा: IDFC First Bank Fraud: आयडीएफसी फर्स्ट बँकेचा धक्कादायक खुलासा; ५९० कोटींची संशयित फसवणूक?
चंदीगड शाखेत सुमारे ५९० कोटींचा संशयित फसवणूक
काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या IDFC बँकेच्या एका शाखेतून देखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. IDFC बँकेच्या चंदीगड शाखेत सुमारे ५९० कोटींचा संशयित फसवणूक आढळून आली होती, ज्यामध्ये हरियाणा सरकारच्या काही खात्यांचा देखील समावेश आहे. बँकेने २१ फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये त्यांनी हरियाणा सरकारच्या एका विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर प्रारंभिक अंतर्गत चौकशी केल्याचे सांगितले होते.
जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा सिस्टममध्ये नोंदवलेल्या शिल्लक आणि संबंधित सरकारी संस्थांनी नोंदवलेल्या रकमेत आणखी तफावत आढळून आली. प्राथमिक चौकशीच्या आधारे, यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. सध्या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू आहे.