
Kotak vs Federal Bank
सध्या डील किमतीबाबत चर्चा सुरू आहे. या पोर्टफोलिओमध्ये वैयक्तिक कर्जे आणि काही गृहकर्जाचा समावेश आहे, जे डायचे बँक विकू इच्छिते. तथापि, या पोर्टफोलिओमध्ये किती वैयक्तिक कर्जे आणि गृहकर्जाचा समावेश आहे हे स्पष्ट नाही. बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन व्यवसायात अंदाजे २५,००० कोटी रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता आहे. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात, बँकेच्या किरकोळ व्यवसायाने एकूण २,४५५ कोटी रुपये उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या २,३६२ कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा हे ४% जास्त आहे,
हेही वाचा : Share Market Today: नकारात्मक पातळीवर होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूक करताना सावध राहा!
भारतीय बँकांना याचा काय फायदा आहे?
ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२५ व्या अखेरीस डायचे बैंकेची रिटेल बैंकिंग मालमता एकूण २५,०३८ कोटी रुपये होती. डायचे बैंकेचे सीईओ खिश्चन सिविंग यांनी जागतिक स्तरावर बैंकेला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी पुनर्रचना योजना सुरू केली आहे. या योजनेचा एक भाग म्हणून, डायचे बँक भारतातील रिटेल व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा मानस आहे. कोटक महिंद्रा बँक आणि फेडरल बँकेच्या प्रवक्त्यांनी ईमेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही. डायचे बैंकेच्या प्रवक्त्यानेही या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
एका सूत्राने सांगितले की, चर्चा सुरू आहे, परंतु मूल्यांकनांचा विचार केला पाहिजे, कोटक आणि फेडरल बँक दोघेही पोर्टफोलिओ मिळवून त्याचा व्यवसाय वाढविण्यात रस घेतात आणि ही अशीच एक सधी आहे. यामुळे त्यांना डायचे बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन व्यवसायातही हिस्सा मिळेल, जो या क्षेत्रातील दोन्ही बैंकांच्या महत्वाकांक्षा आणि त्यांच्या रिटेल व्यवसायांशी जुळेल.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले
जर्मनीची बँक भारतातून काढते पाय घेत असल्याने आता त्या बँकेवर कोण पोर्टफोलिओ मिळवेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .