Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले
भाऊ-बहीण आणि Live In Couple देखील आता होणार कव्हर, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे बदलले धोरण
भारतात गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. सध्या लग्नसारईचा काळ सुरु झाला आहे. अशावेळी सोन्याच्या दुकांनात सहसा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या हे चित्र अगदी उलट झालं आहे. सध्याच्या वाढत्या दरांमुळे सोन्याची खरेदी कशी करावी, असा प्रश्न आता ग्राहकांसमोर आहे. कारण सोन्याच्या सततच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलं आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या मनासारखे दागिने करण्यासाठी मोठी खटपट करावी लागत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
केवळ सोन्याचेच नाही तर चांदीचे दर देखील सतत वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात सुमारे 8 ते 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं – चांदी खरेदी करणं आता अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. सोन्याच्या वाढत्या दरांमागे अनेक कारण आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या उपाध्यक्षा अक्षा कंबोज यांच्या मते, जागतिक स्तरावर व्याजदर कपातीची चिंता कमी झाली असली तरी, सोन्याची मागणी अजूनही मजबूत आहे. लग्नांमुळे दागिन्यांच्या खरेदीत मध्यम वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि गुंतवणूकदारांनी अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी सोन्याकडे लक्ष द्यावे.
दिल्ली शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,400 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,330 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,920 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,210 रुपये आहे. सुरत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,230 रुपये आहे.
| शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| बंगळुरु | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| पुणे | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| केरळ | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| कोलकाता | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| मुंबई | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| नागपूर | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| हैद्राबाद | ₹1,13,890 | ₹1,24,250 | ₹93,180 |
| जयपूर | ₹1,14,040 | ₹1,24,400 | ₹93,330 |
| लखनौ | ₹1,14,040 | ₹1,24,400 | ₹93,330 |
| चंदीगड | ₹1,14,040 | ₹1,24,400 | ₹93,330 |
| दिल्ली | ₹1,14,040 | ₹1,24,400 | ₹93,330 |
| नाशिक | ₹1,13,920 | ₹1,24,280 | ₹93,210 |
| सुरत | ₹1,13,940 | ₹1,24,300 | ₹93,230 |






