लाखोंची नोकरी सोडली अन् मासे विकायला सुरुवात केली; आज आहे तब्बल 4000 कोटींचा मालक!
शेती हा आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जण आपली नोकरी सोडून शेतीसह शेतीआधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर, यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने मत्सपालन व्यवसायामध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. या व्यवसायातून त्याने आज तब्बल ४,००० कोटींपेक्षा अधिक मार्केट व्हल्यू असलेली कंपनी उभी केली आहे. ज्यामुळे सध्या या तरुणाची सर्वदूर चर्चा होत आहे.
सीफूड ब्रँड कॅप्टन फ्रेशची सुरुवात
स्वप्न बघितल्यावर ती पूर्ण होतातच. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्ही जर कामात सातत्य ठेवले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. असेच यश उथम गौडा या शेतकऱ्याने मिळवले आहे. त्यांनी सीफूडच्या व्यवसायात खूप मोठे नाव कमावले आहे. उथम गौडा यांनी कॅप्टन फ्रेशची सुरुवात केली. ही कंपनी मासे आणि सीफूड यासारखी उत्पादने घेऊन ते स्टोअरमध्ये ठेवते. उथम गौडा यांनी सीफूड ब्रँड कॅप्टन फ्रेशची सुरुवात केली.
हे देखील वाचा – ‘आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी’; वाचा… नेमकी कोणी केलीये घोषणा!
नोकरीला ठोकला रामराम
उथम गौडा हे ‘कॅप्टन फ्रेश’चे संस्थापक आणि सीईओ आहे. त्यांनी नेक्कांती सी फूड्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह वाइट प्रेसिडेंट म्हणून काम केले. त्यांना लाखो रुपये पगार होता. परंतु, मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी एस. पी जैन इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले आहे. त्यांनी सीफूडच्या सप्लाय चैनमध्ये क्रांती करण्यासाठी ही कंपनी सुरु केली.
किती होते दैनिक विक्री
कॅप्टन फ्रेश ही कंपनी दर दिवशी १०० टनपेक्षा जास्त ताजे मासे आणि ३ डझन सीफूड विकते. कंपनीचे ५० पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर आहे.त्यांची २,५०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. कॅप्टन फ्रेश कंपनी ही सकाळी ६ वाजेपर्यंत फ्रेश सीफूड पोहचवण्याची गॅरंटी देते.
कंपनीची मार्केट वॅल्यू ४,००० कोटींपेक्षा जास्त
या कंपनीची मार्केट वॅल्यू ४,००० कोटींपेक्षा जास्त आहे. सीफूड सप्लाय चैनला अजून चांगले बनवण्यासाठी कंपनी प्रयत्न करते. कंपनीने नुकतेच १२.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे. लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कंपनी सुरु आहे. या या कंपनीची वॅल्यु कोट्यवधींच्या घरात आहे.