'आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी'; वाचा... नेमकी कोणी केलीये घोषणा!
विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत प्रचार आणि जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. या जाहीर सभेत राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. त्यासोबतच विविध प्रकारच्या घोषणा सुद्धा देताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे आता आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा जाहीर सभेत करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या घोषणेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. यावेळी जाहीर सभेत भाषण करतना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासोबतच मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी निर्माण करत आहोत.
तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असलेले आपले सरकार एक रुपयात 8000 कोटींचा पीक विमा देत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करुन शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती देण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. पुढच्या पाच वर्षात माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती आपल्या सरकारने दिली आहे.
तुमच्या आशीर्वादाने आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासोबतच एमएसपीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
हे देखील वाचा – कधीकाळी भारताची शान होती ‘ही’ विमान कंपनी; आज झालीये बर्बाद… वाचा.. तिची खडतर कहाणी!
आगामी 5 वर्षात धुळे नंबर 1 चा जिल्हा होणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासाची गंगा जिथून वाहते आहे. त्या खान्देशातील धुळ्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात केली. याचा अतिशय आनंद होत आहे. 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये जे काम झाले आहे. त्यामुळे धुळे जिल्हा पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा नंबर 1 चा जिल्हा होणार आहे.