Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोटक महिंद्रा प्राइममध्ये नेतृत्व बदल! सुरज राजप्पन नवे एमडी आणि सीईओ; शाहरुख तोडीवाला ३१ मे रोजी होणार निवृत्त

संचालक मंडळाने श्री. सुरज राजप्पन यांची १ जून २०२६ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्‍यांच्‍या मंजूरीनुसार मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 04:43 PM
कोटक महिंद्रा प्राइममध्ये नेतृत्व बदल! सुरज राजप्पन नवे एमडी आणि सीईओ

कोटक महिंद्रा प्राइममध्ये नेतृत्व बदल! सुरज राजप्पन नवे एमडी आणि सीईओ

Follow Us
Follow Us:

 

  • कोटक महिंद्रा प्राइममध्ये नेतृत्व बदल!
  • सुरज राजप्पन नवे एमडी आणि सीईओ
  • शाहरुख तोडीवाला ३१ मे रोजी होणार निवृत्त
मुंबई, सोमवार, मार्च ३०, २०२६: कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएल) या कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची उपकंपनी आणि वाहन वित्तपुरवठा क्षेत्रातील आघाडीच्‍या संस्‍थेने संचालक मंडळाकडून मंजूर केलेल्या नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे.

संचालक मंडळाने श्री. सुरज राजप्पन यांची १ जून २०२६ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्‍यांच्‍या मंजूरीनुसार मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. सुरज राजप्पन यांनी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना या संस्थेतील विविध विभागांमधील २४ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. सध्याचे मॅनेजिंग डायरेक्‍टर व सीईओ श्री. शाहरुख तोडीवाला हे कोटक ग्रुपमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावल्यानंतर ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

कोटक महिंद्रा बँकेचे एमडी व सीईओ अशोक वासवानी म्‍हणाले, ”शाहरुख यांनी कोटक महिंद्रा प्राइममध्ये विचारपूर्वक वाढ, जोखीम शिस्त आणि ग्राहक-केंद्रितता यांचा प्रबळ वारसा मागे सोडला आहे. आम्ही या नेतृत्वाच्या स्थानी सुरज यांचे स्वागत करतो. त्यांचा उद्योगातील सखोल अनुभव आणि कार्यक्षमता केएमपीएलला पुढील टप्प्यातील वाढीसाठी सज्ज करेल.”

‘ही तर आर्थिक आत्महत्या…’, CA ने दिला गुंतवणुकीबाबत इशारा, चक्रवाढ व्याजाकडे दुर्लक्ष ठरेल धोकादायक

केएमपीएलचे एमडी व सीईओ शाहरुख तोडीवाला म्‍हणाले, ”केएमपीएलच्या ३० वर्षांच्या प्रवासाचा भाग असण्‍याचा आणि त्‍यांच्या वाढीत योगदान देण्‍याचा अनुभव अत्‍यंत समाधानकारक राहिला आहे. या कंपनीचे नेतृत्व करणे हा माझा बहुमान आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, सुरज आणि त्यांची लीडरशीप टीम या भक्कम पायावर अधिक प्रगती करतील आणि केएमपीएलला नवीन उंचीवर घेऊन जातील.”

केएमपीएलचे नियुक्त एमडी व सीईओ सुरज राजप्‍पन म्‍हणाले, ”मला संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्‍या विश्वासाचे अत्‍यंत सन्‍माननीय वाटत आहे. केएमपील शिस्तबद्ध वाढ, नाविन्‍यता आणि सर्वोत्तम ग्राहक अनुभवावर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवेल. तसेच, आम्‍ही सर्व ओईएम आणि डीलर भागीदारांसोबतचा सहयोग अधिक दृढ करू.”

भारतातील वाहन वित्तपुरवठा क्षेत्रातील प्रदीर्घ आणि ऐतिहासिक फ्रँचायझी

कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचा (केएमपीएल) वारसा १९९६ पासून दिसून येतो. कोटक महिंद्रा फायनान्स आणि फोर्ड क्रेडिट इंटरनॅशनल यांच्यातील ६०:४० अशा भागीदारीतून कोटक महिंद्रा प्राइमस लिमिटेड या नावाने ही कंपनी स्थापन करण्‍यात आली होती आणि भारतातील सर्वात पहिल्या संघटित कार-फायनान्स प्लॅटफॉर्मपैकी एक होती. २००५ मध्ये कोटक महिंद्रा बँकेने फोर्ड क्रेडिटचा हिस्सा विकत घेतला, ज्यामुळे ही कंपनी कोटक ग्रुपची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आणि त्यानंतर कंपनीचे नाव कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड असे बदलण्यात आले.
गेल्या जवळपास तीन दशकांमध्ये भारतातील ऑटोमोटिव्ह आणि ग्राहक कर्ज बाजारपेठेसोबत केएमपीएल विकसित होत गेली आहे. ही संस्‍था जोखीम शिस्त, प्रशासन आणि संस्थात्मक सातत्य या मूल्यांवर आधारित आहे, तसेच कोटक ग्रुपच्‍या व्यापक आर्थिक सेवा परिसंस्थेशी नेहमीच संलग्‍न राहिली आहे.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

Web Title: Leadership change at kotak mahindra prime suraj rajappan appointed new md and ceo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Business News
  • Kotak Mahindra Bank

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.