Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा… मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर झाली आहे. ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे 2024 या यादीनुसार, वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 432.4 अब्ज डॉलर झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 14, 2024 | 04:00 PM
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा... मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा... मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

Follow Us
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत वॉल्टन कुटुंबाने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे 2024 या यादीनुसार, वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 432.4 अब्ज डॉलर झाली आहे. ही संपत्ती एलन मस्क आणि अनेक मध्य-पूर्व राजघराण्यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त आहे.

वॉल्टन कुटुंबाबाबतची माहिती

वॉल्टन कुटुंबाची ही संपत्ती वॉलमार्टच्या 46 टक्के शेअर्समधून आली आहे. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी रिटेलर आहे. ज्याने गेल्या आर्थिक वर्षात 648.1 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. वॉलमार्टच्या शेअर्समध्ये यावर्षी 80 टक्के वाढ झाली आहे. ज्यामुळे कुटुंबाची संपत्ती 172.7 अब्ज डॉलरने वाढली आहे. याचा अर्थ वॉल्टन कुटुंब दररोज 473.2 दशलक्ष डॉलर आणि दर मिनिटाला 3,28,577 डॉलर कमवत आहे.

जगातील 5 सर्वात श्रीमंत कुटुंबांची माहिती

वॉल्टन कुटुंब (अमेरिका) : 432.4 अब्ज डॉलर संपत्तीसह पहिले स्थान आहे. कुटुंबाच्या तीन पिढ्या वॉलमार्ट चालवतात, ज्याची जगभरात 10,600 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

अल नाह्यान फॅमिली (युएई) : 323.9 अब्ज डॉलर मालमत्तेसह दुसरे स्थान आहे. हे कुटुंब संयुक्त अरब अमिरातीचे राजघराणे आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या नेतृत्वाखाली हे कुटुंब आहे. कुटुंबाची संपत्ती प्रामुख्याने तेल उद्योगाशी निगडीत आहे आणि अबू धाबीच्या शेअर बाजारात त्यांच्या व्यवसायांचा वाटा 65 टक्के आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; 14 जून 2025 पर्यंत असेल संधी!

अल थानी कुटुंब (कतार) : 172.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसरे स्थान आहे. हे कुटुंब कतारच्या राजघराण्यातील आहे आणि त्यांची संपत्ती तेल आणि वायूच्या अफाट साठ्यातून आली आहे. त्याच्या व्यवसायांमध्ये हॉटेल, विमा कंपन्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय मालमत्तांचा समावेश आहे.

हर्मेस फॅमिली (फ्रान्स) : 170.6 अब्ज डॉलरसह मालमत्तेसह चौथे स्थान आहे. या कुटुंबाकडे फ्रान्सचा प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Hermès आहे. ज्यामध्ये सहा पिढ्या आणि 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत.

कोच कुटुंब (अमेरिका) : 148.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचवे स्थान आहे. हे कुटुंब अमेरिकेतील तेल उद्योगाशी संबंधित आहे.

भारतीय कुटुंबांची क्रमवारी

अंबानी कुटुंब : 99.6 अब्ज डॉलर संपत्तीसह 8व्या क्रमांकावर आहेत. अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्या रिलायन्स इंडस्ट्रीज चालवतात, जी वेगाने विस्तारत आहे.

मिस्त्री कुटुंब : 41.4 अब्ज डॉलर संपत्तीसह 23 व्या क्रमांकावर आहे. मिस्त्री कुटुंबीय पाच पिढ्यांपासून शापूरजी पालोनजी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत.

जागतिक अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत वाढ

ब्लूमबर्गच्या अहवालात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 406.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. वॉल्टन कुटुंबाचे हे वाढते वर्चस्व आणि भारतीय कुटुंबांची क्रमवारी हे स्पष्ट करते की, जागतिक स्तरावर आर्थिक शक्तीचे केंद्र सतत बदलत आहे.

Web Title: List of the worlds richest families announced read what rank is mukesh ambani family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Business News
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
1

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
2

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
4

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.