शेतकऱ्यांना दिलासा...! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? वाचा... काय आहे सरकारचा प्लॅन!
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटांसह सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी सोयाबीन, कापूस या पिकांना हमीभावाइतकाही दर मिळाला नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तर गेल्या वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. परिणामी, शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये खर्च करूनही हाती काही लागले नाही.
मंत्री सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी
त्याआधीच्या वर्षीही काहीशी हीच परिस्थिती आहे. तर फळबाग शेतकरी देखील नैसर्गिक संकटांमुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबला आहे. परिणामी आता राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हीच बाब लक्षात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे.
काय म्हटले आहे अब्दुल सत्तार?
राज्यातील शेतकरी मागील काही काळापासून संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात याशिवाय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने विचार करून महिनाभराच्या आत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे आता मंत्री सत्तार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.