भारतीय म्हणून कार कंपनीने मजाक उडवला; तब्बल 10 कार खरेदी करत, ...या राजाने कंपनीला शिकवला धडा!
इंग्रजांनी भारतावर तब्बल १५० वर्ष राज्य केले. या काळात इंग्रजांनी भारतीयांवर अनेक जुलूम केले. इतकेच नाही तर भारतीय राजा महाराजांचा अपमान करण्याची एकही संधी इंग्रज सोडत नव्हते. अशातच रोल्स रॉयस या कार कंपनीने कार खरेदी करण्यासाठी गेले असता, एका भारतीय राजाचा मोठा अपमान केला होता. ज्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी, त्याच क्षणी त्या कंपनीच्या १० कार खरेदी केल्या होत्या.
आजही भारतीयांची छाती गर्वाने फुलून जाते
विशेष म्हणजे त्यांनी या कार स्वत:साठी न वापरता स्थानिक पालिकेला कचरा वाहण्यासाठी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अपमानाचा बदला घेत, या कंपनीच्या महागड्या गाड्या कचरा वाहण्यासाठी लावल्याने, संबंधित कंपनीची मोठी नाचक्की झाली होती. ज्यामुळे कंपनीला या भारतीय राजाची जाहिरपणे माफी मागावी लागली होती. त्यामुळे आजही या भारतीय राजाची कहाणी समोर येताच, भारतीयांची छाती गर्वाने फुलून जाते.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
अलवरचे महाराजा जय सिंह प्रभाकर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानमधील अलवरचे महाराजा जय सिंह प्रभाकर असे त्यांचे नाव असून, ते त्याकाळी रोल्स रॉयस कंपनीच्या शोरुमला कार खरेदी करण्यासाठी गेले असता. साधारण कपडे आणि भारतीय असल्याने त्यांचा इंग्लंडमध्ये अपमान करण्यात आला होता. त्यावेळी राजा जय सिंह प्रभाकर यांनी लगेचच आपल्या अपमानाला प्रत्युत्तर दिले नाही. ते थांबलेल्या हॉटेलवर परत गेले. त्यांनी राजेशाही पोशाख घातला.
हेही वाचा – देशात वेगाने वाढतोय क्रेडिट कार्डचा वापर; ‘या’ बॅंकेचे खातेधारक करतायेत सर्वाधिक वापर
१० आलिशान कार महापालिकेला कचरा वाहण्यासाठी दिल्या
शोरुम जाण्यााआधी कंपनीच्या शोरूमला सेवकामार्फत संदेश पाठवला की त्यांना 10 रोल्स रॉयस गाड्या खरेदी करायच्या आहेत. मात्र, ते शोरुममध्ये जाताच त्यांचे अचानक बदललेले कपडे पाहून शोरूमचे सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले. महाराज जेव्हा शोरूममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला होता. भारतात परतल्यानंतर त्यांनी या १० आलिशान कार महापालिकेला कचरा वाहण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले.
दरम्यान, इंग्रज काळात रोल्स रॉयस कंपनीच्या आलिशान गाड्या जेव्हा अल्वरच्या रस्त्यावर कचरा गोळा करताना दिसल्या. तेव्हा भारतातील ब्रिटिश सरकारला आश्चर्याचा धक्का बसला. इंग्रज अधिकाऱ्यांनी अलवरच्या महाराजांना तसे न करण्याबाबत अनेकवेळा प्रयत्न केले. पण, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. त्यांनी रोल्स रॉयस कंपनीकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.
कंपनीने मागितली होती माफी
अखेरीस रोल्स रॉइस कंपनीचे प्रतिनिधी भारतात आले. त्यांनी महाराज जयसिंह यांची माफी मागितली. कचऱ्याची वाहने बदलून नवीन वाहने आणण्याची तयारीही त्यांनी दिली. पण, महाराजांनी ही ऑफर नाकारली होती. ही ऐतिहासिक घटना अन्यायाविरुद्ध भारतीयांच्या अभिमानाची आणि प्रतिकाराची आठवण करून देणारी आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी आपल्या शाही पदाचा कसा उपयोग केला. हेच या घटनेवरून दिसून येते. ही कथा आजही भारतीय लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. स्वाभिमान किती महत्वाचा असतो, हेच यातून दिसून येते.