Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांच्या मदतीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना २ क्रेडीट पॉईट विद्यापीठामार्फत मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 06:09 PM
सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?

सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?

Follow Us
Follow Us:

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती लाख भाविक येणार यापेक्षा आलेल्या प्रत्येक भाविकाला रामकुंडापर्यंत पोहचवून अमृतस्नानानंतर तेथून पुन्हा साधुग्राम अथवा त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षीत पाठवणे महत्वाचे आहे. यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञनाचा शक्य तितका वापर करीत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले.

‘दैनिक नवराष्ट्र’ तसेच ‘दैनिक नवभारत’च्या कार्यालयात सिंहस्थ कामांबाबत माहिती देताना कर्णिक म्हणाले की, पोलिस प्रशासनाच्यादृष्टीने सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन प्रशासकीय, बंदोबस्त आणि वाहतूक अशा प्रमुख वेगवेगळ्या स्थरावर सुरू आहे. जवळपास ३३ हजारापेक्षा अधिक पोलिस बंदोबस्तासाठी राहतील. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा, त्यांच्या जेवणाचा, आजारपणाचा प्रश्नही सोडवण्यात येतो आहे. जलद प्रतिसाद युनिट (क्युआरटी) शहरातील सर्व घाटांसह इतर प्रमुख ठिकाणांवर प्रत्यक्ष पोहचून तेथील व्हिडीओज, फोटोज काढून नकाशे तयार करीत आहेत. त्यात स्नायपरचे ठिकाण कोणते असावे, आपत्तकालीन परिस्थितीत क्युआरटी कोणत्या मार्गाने घटनास्थळी पोहचू शकते, कमांड सेंटर कुठे असेल अशी अनेक प्रकारची प्रशासकीय कामे सध्या सुरू आहेत. अशी कामे करताना ३६० कॅमेरे फायद्याचे ठरतात. त्याचा वापर आम्ही करतो.

‘या’ दिवशी होणार अमृतस्नान; नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा समावेश

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांच्या मदतीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना २ क्रेडीट पॉईट विद्यापीठामार्फत मिळणार आहे. आपल्याकडे महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच परिसरात शिक्षक व पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाच्या कामात सहभागी करून घेणार आहोत. युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. तसेच त्यांना या निमित्ताने पोलिसांच्या कामाचा अनुभव सुद्धा मिळेल, देश परदेशातून आलेल्या तसेच नाशिककर भाविकांनाही रामकुंडावर स्न्नानासाठी यायचे आहे. अशावेळी गर्दीचे योग्य नियोजन काटेकोर होणे महत्वाचे आहे. सर्वांनाच रामकुंडावर स्नान करायचे आहे. मात्र, तेथे पोहचताना त्यांना शहराबाहेरील पार्किंग, तेथून शहरा अंतर्गत पार्किंग व पुढे पायी प्रवास करावा लागणार आहे. या दरम्यान एकही भाविक सीसीटीव्हींच्या कक्षेबाहेर राहणार नाही, याची काळजी आम्ही घेतली असल्याचे पोलिस आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारांची घुसखोरी रोखणार एआय

सिंहस्थ कुंभमेळ्या लाखो भाविक येणार आहेत. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच दहशतवादीही सहज मिसळू शकतात. त्यामुळे आम्ही आधुनिक तंत्रज्ञान असलेले सीसीटीव्ही ठिकठिकाणी बसवणार आहोत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहरा ओळखण्याचे काम सोपे होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने एआयचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, राज्य व केंद्र सरकारच्या पुढाकाराने तसेच लोकसहभागातून २०२७ चा कुंभमेळा विक्रमी आणि यशस्वी करू, असा विश्वास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला.

थोडी कळ सोसावीच लागणार

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित शहरात प्रचंड पायाभूत सुविधांची कामे सुरू आहे. जवळपास ३० रस्त्यांची कामे पूर्णत्वास जातील. समृद्धी महामार्ग सुरू झाला असून, लवकरच शहरचा सर्वात प्रमुख असलेला बाहारिंग रोड सुद्धा तयार होईल. यामुळे आपल्याला वाढवण बंदर जवळ येईल. रेल्वे, महामार्गाच्या कक्षा रूदावत असताना या कामांना थोडासा वेळ लागणार आहे. जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर नाशिकचे बदललेलं रूय आपल्याला अनुभवता येईल. रस्ते, रेल्वे, जलमार्ग अशा दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर नाशिकचा विकास खूप जलद गतीने होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त कर्णिक यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Web Title: Ai will be used at simhastha guiding devotees to ramkund while managing the crowd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • india
  • Nashik

संबंधित बातम्या

India Tourism : भारताच्या वाढत्या पर्यटन प्रभावाची दखल; ऐश्वर्या राय बच्चन जेडब्लू मॅरियटची ग्लोबल फेस
1

India Tourism : भारताच्या वाढत्या पर्यटन प्रभावाची दखल; ऐश्वर्या राय बच्चन जेडब्लू मॅरियटची ग्लोबल फेस

100 अब्ज डॉलर गुंतवणुकीवर भर! भारत-नॉर्वे बिझनेस समिटमुळे आर्थिक सहकार्याला नवी चालना
2

100 अब्ज डॉलर गुंतवणुकीवर भर! भारत-नॉर्वे बिझनेस समिटमुळे आर्थिक सहकार्याला नवी चालना

स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Motorola चा नवा फोन लॉन्च; 50MP सेल्फी कॅमेरा, Dolby Atmos स्पीकर्स अन् 50 तासांची दमदार बॅटरी
3

स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Motorola चा नवा फोन लॉन्च; 50MP सेल्फी कॅमेरा, Dolby Atmos स्पीकर्स अन् 50 तासांची दमदार बॅटरी

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…
4

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.