फोटो सौजन्य- सोशल मीडिया
आघाडीच्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Flipkart, AliExpress, TeeShopper, वर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची, दाऊदच्या प्रतिमेचे उद्दात्तीकरण करणाऱ्या टी-शर्टची विक्री केली जात होती. यासंबंधी आज दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलिसांनी अॅक्शन घेतली असून अशा सर्व ई कॉमर्स प्लॅटफॉर्वर FIR दाखल करण्यात आली आहे. ही विक्री सुरु झाली त्यावेळीच सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रातील कारवाईसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सायबर विभाग सोशल मीडियासह विविध डिजिटल माध्यमांचे निरीक्षण केले जात आहे समाजात गोंधळ निर्माण करणारे व गैरकृत्यांना प्रोत्साहन देणारे विषय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीवरून, Flipkart, AliExpress, TeeShopper, आणि Etsy सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम यांच्या चित्रांचा उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध होते. गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण करणारी अशी उत्पादने युवा वर्गावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. ही प्रकारची सामग्री समाजाच्या मूल्यांना हानी पोहोचवते आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करते, ज्यामुळे तरुणांमध्ये चुकीच्या प्रवृत्तींचा प्रसार होऊ शकतो.
महाराष्ट्र सायबर विभागाने CR No. 13/2024 अंतर्गत विक्रेत्यांवर आणि अशा उत्पादनांचा प्लॅटफॉर्मवर समावेश करणाऱ्या Flipkart, AliExpress, TeeShopper, आणि Etsy या प्लॅटफॉर्म्सवर Bharatiya Nyaya Sanhita (BNS), 2023 च्या कलम 192, 196, 353, 3 आणि IT Act, 2000 च्या कलम 67 अंतर्गत FIR दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग सुरक्षित डिजिटल वातावरण राखण्यास आणि सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवणाऱ्या सामग्रीला प्रतिबंध घालण्यास कटिबद्ध आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारे टी शर्टची विक्री केली जात होती त्यावेळी युजर्सकडून मोठ्या प्रमाणात संतापजनक प्रतिक्रिया आल्या होत्या. असे टी शर्ट विकणे म्हणजे लहान मुले आणि सामान्य लोकांमध्ये गुंडांचा गौरव होत असल्याचे युजर्सचे म्हणणे होते. एका युजरने लिहिले की, अशा प्रकारच्या वेबसाइट्सना लाज वाटली पाहिजे!” अनेकांनी या प्लॅटफॉर्मना डी प्लॅटफॉर्म म्हटले आहे.
टी शर्टची किंमत
या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन बिश्नाई आणि दाऊदचे उदात्तीकरण करणारे टी शर्ट हे 145 ते 249 पर्यंत विकले जात होते. लोकांच्या विरोधानंतर या प्लॅटफॉर्मवरुन ही विक्री थांबवण्यात आली होती. मात्र अशाप्रकारच्या टी शर्टची विक्री कशी करण्यात येते हा सवाल इथे विचारला जात आहे. महाराष्ट्र पोलिसाकडून केल्या जाणाऱ्या तपासामध्ये या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.