mchi 12th property exhibition in kalyan benefits can be availed between 6th to 9th april 2023 nrvb
कल्याण : क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली (Credai MCHI Kalyan Dombivli) युनिट गेली ११ वर्ष लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा स्वप्नातलं घर घेण्याची एक सुवर्णसंधी (Golden Opporunity) येऊन आली आहे. क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट चे १२ वे प्रॉपर्टी एक्झिबिशन (12th Property Exhibition) ६ ते ९ एप्रिल दरम्यान कल्याण पश्चिमेतील फडके मैदान (Phadke Maidan in Kalyan West) येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी एमसीएचआयचे रवि पाटील, एमसीएचआय अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, कॉर्डिनेटर दिनेश मेहता आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात सर्व रेरा प्रोजेक्ट नामांकित विकासक एका छताखाली बघता येणार आहे. फक्त कल्याण डोंबिवलीच नव्हे तर अंबरनाथ बदलापूर बापगाव कोनगाव टिटवाळा शहापूर परिसरातील सर्व सुविधा युक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवली करांना मिळणार आहे. १६ लाखांपासून सुरु होणारी आणि १ करोड पर्यंतची घरे यावेळी प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी स्वप्नातली घरे देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.
[read_also content=”अमृतपालचा पहिला व्हिडिओ आला समोर, पोलिसांना दिले खुले आव्हान, म्हणतो… https://www.navarashtra.com/india/strange-amritpal-singh-released-video-in-first-time-which-he-attempt-to-provoke-the-sikhs-nrvb-379444.html”]
४० हून अधिक विकासक १५० हून अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहेत. गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता 25 हजार हून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आहे. या वर्षी तर स्पॉट बुकिंग डिस्काउंट तर आहेच पण त्या सोबत प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे.
या वर्षी पुन्हा एकदा सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे भेट देणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे तसेच अनेक अधिकारी, अनेक नगरसेवक देखील एक्झिबिशनला भेट देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.