Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan-Taloja Metro : आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

मुंबई मेट्रो लाईन 12 या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण - डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 06:21 PM
आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास
  • मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नांना यश
कल्याणः कल्याण लोकसभा मतदारसंघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे. कल्याण – डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहीसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला.

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गापर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका

ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण–मानपाडा–कटाई नाका–कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन–12 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल.

कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर ) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.

निलजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे–बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे.

या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मेट्रो १२ अ ची स्थानके

या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे.
प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव.

संरचनात्मक संकल्पना

या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे.

मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण–राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (Integrated single pier) संकल्पना वापरली जाणार आहे.(फ्लायओव्हरचा सुपर-स्ट्रक्चर वगळून).

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

कल्याणफाटा ते राजनोली दरम्यान डबल डेकर उड्डाणपूल

कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा (शिळफाटा) ते भिवंडीजवळी आग्रा महामार्गावरील राजनोली पर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ठिकाणी डबर डेकर उन्नत मार्ग उभारणीसाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या चार पदरी डबल डेकर उन्नत मार्गावरून एकाच वेळी मेट्रो आणि रस्ते वाहतूक होणार आहे. कोणत्याही कोंडीशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागातले वर्दळीचे चौक टाळून या मार्गाने शिळफाटा ते थेट भिवंडी असा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ५ हजार ९०९.२१ कोटी इतका असून त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या उन्नत मार्गाची एकूण लांबी १९.४० किलोमीटर इतकी आहे. याची सुरूवात कल्याणफाटा (शिलफाटा जंक्शन) पासून होऊन कटई नाका, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे भिवंडीतील राजनोली जंक्शन येथे समाप्ती होईल.

मेट्रो इंटीग्रेशन

या मार्गाचा समावेश ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५, कल्याण – तळोजा मेट्रो मार्ग १२ या दोघांशी होईल. तसेच कल्याण – तळोजा मेट्रो १२ अ या विस्तारीत मार्ग आणि कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ या प्रस्तावीत मेट्रो मार्गांशीही याचे समन्वय केले जाणार आहे.

कसा असेल उन्नत मार्ग

या उन्नत मार्गामध्ये पहिल्या स्तरावर वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गावर ८ ठिकाणी प्रवेश (इंट्री) आणि निर्गमन (एक्झिट) रस्ते (रॅम्प) प्रस्तावित आहेत. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल (पलावा – दिवा पनवेल आणि पत्री पूल क्रॉसिंग) तसेच २ प्रमुख पूल, देसाई खाडी आणि उल्हास नदी ( दुर्गाडी परिसर) प्रस्तावित आहेत.

 

Web Title: Shilphata traffic metro line 12 set to be a gamechanger check station details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • kalyan
  • Mumbai

संबंधित बातम्या

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
1

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार
4

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.