1148 कोटींच्या जगातील सर्वाधिक महागड्या कारचा 'हा' आहे मालक, वाचा.. का खास आहे 'ही' कार?
अनेकांना आपला जोपासण्याची आवड असते. छंद ही एक मोठी गोष्ट आहे… हे यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकले आणि वाचले असेल. लोक आपले छंद पूर्ण करण्यासाठी लाखो-कोटी रुपये देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपला छंद जोपासण्यासाठी अर्थात एक जुनी कार घेण्यासाठी 1148 कोटी रुपये खर्च केले आहे. विशेष म्हणजे तब्बल 68 वर्षे जुनी कार घेण्यासाठी, या व्यक्तीने आतापर्यंतची सर्वाधिक खर्च केली आहे. या लिलावात या कारची जगातील सर्वात महागडी कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
सर्वात जुनी कार 1148 कोटींना विक्री
68 वर्षे जुन्या असलेल्या या कारचा लिलाव करण्यात आला आहे. 300 एसएलआर मर्सिडीज बेंझ कार खरेदी करण्यासाठी जोरदार बोली लावली गेली. कारची लिलावाची रक्कम प्रत्येक बोलीनुसार वाढत गेली. मर्सिडीज बेंझच्या 1955 मॉडेल 300 एसएलआर खरेदीसाठी सर्वाधिक बोली 143 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 1148 कोटी रुपये लावली गेली. यासह ती जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे.
का खास आहे ही कार
68 वर्षे जुन्या या मर्सिडीज-बेंझ कारचे केवळ दोन प्रोटोटाइप मॉडेल बनवले गेले. कारच्या वैशिष्ट्यांमुळे ते मौल्यवान बनले आहे. स्पोर्ट्स कार रेस, 3.0 लीटर इंजिन असलेली ही कार, ताशी 290 किमीचा वेग त्या काळातील जगातील सर्वात वेगवान कार होती. विंटेज कार कंपनी आरएम सोथेबीने लिलाव केला. या लिलावातून मिळणारा पैसा मर्सिडीज ब्रॉन्झ फंड म्हणून वापरला जाईल. हा पैसा तरुणांच्या शिक्षण आणि संशोधनासाठी वापरण्यात आला. इंजिनच्या तुलनेत या कारची लाइट बॉडी तिला सुपर स्पीड देते. कंपनीला या कारचे इंजिन W196 फॉर्म्युला वन कार चॅम्पियनशिपमधून मिळाले आहे.
कोणी खरेदी केली जगातील ही सर्वात महागडी कार?
जगातील सर्वात महागडी कार जर्मनीच्या मर्सिडीज-बेंझ संग्रहालयाच्या मालकीची होती. कंपनीने ती नॉन व्हेईकल कलेक्शन म्हणून स्वतःकडे ठेवली होती. 1955 मध्ये स्थापन झालेली ही कार कंपनी 2022 मध्ये सार्वजनिक लिलावाद्वारे विकली गेली. हा लिलाव आरएम सोथेबीजने आयोजित केला होता, ज्यामध्ये सायमन किडस्टन नावाच्या व्यक्तीने 1148 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून ही कंपनी विकत घेतली. किडस्टनने ही ऐतिहासिक कार सर्वात जास्त बोली लावून कार खरेदी केली. मात्र, त्याने ही कार स्वत:साठी घेतली की ग्राहकासाठी हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे.