
नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) वाटपातील वाढीव सुधारणेच्या किंमतीत बदल केला आहे याचा परिणाम म्हणून, महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत ६ रु. किलोग्रॅम आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) ४ रुपयांच्या आसपास कमी झाला आहे.
हे दर १६ ऑगस्ट २०२२ च्या मध्यरात्री आणि १७ ऑगस्ट २०२२ च्या सकाळपासून मुंबईत आणि आसपासच्या शहरांत लागू झाले आहेत. त्यानुसार, CNG च्या सर्व करांसह सुधारित MRP रु.80/Kg आणि घरगुती PNG किंमत रु.48.50/Kg मुंबई आणि आसपासच्या परिसरात लागू झाली आहे.
[read_also content=”आता ना रांग लावयची कटकट, ना सुट्ट्या पैशांवरून होणार वाद आणि ताटकळत थांबायची तर गरजच नाही; कारण मुंबईत होणार आहे ‘याची’ सुरुवात https://www.navarashtra.com/business/go-fuel-home-delivery-starts-in-mumbai-now-there-is-no-need-to-queue-up-no-argument-over-change-money-to-stop-immediately-317834.html”]
CNG ची सुधारित MRP मुंबईतील सध्याच्या किमतीच्या पातळीवर पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 48% ची आकर्षक बचत देते. MGL चे डोमेस्टिक PNG ग्राहकांना अतुलनीय सुविधा, सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पर्यावरण मित्रत्व प्रदान करताना घरगुती LPG च्या सध्याच्या MRP च्या तुलनेत सुमारे 18% बचत देते.
आमच्या सर्व मूल्यवान ग्राहकांनी कृपया या किंमतीच्या बदलांची नोंद घ्यावी असे महानगर गॅस लि.ने प्रसिद्धीला दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे.