फोटो सौजन्य- iStock
मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड जाहीर करत आहे, ‘मिरे अॅसेट निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफ’ ही निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन इंडेक्सची पुनरावृत्ती करणारी/अनुसरण करणारी खुली (ओपन एण्डेड) योजना आणि मिरे अॅसेट निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफ फंड ऑफ फंड ही मिरे अॅसेट निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारी खुली फंड ऑफ फंड योजना. लोकसंख्येच्या स्वरूपात होणारे बदल व वाढता विवेकी खर्च यांच्या चालनेने भारताच्या उत्क्रांत होत असलेल्या उपभोग क्षेत्रात संभाव्य सहभागाची संधी गुंतवणूकदारांना पुरवण्याचे उद्दिष्ट या योजनेपुढे आहे.
निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन इंडेक्समध्ये ई-कॉमर्स, फिनटेक, संपत्ती व्यवस्थापन, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रिअल इस्टेट, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, मनोरंजन आदी क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ७५ स्टॉक्सचा समावेश आहे. यामध्ये भारतीय उपभोक्त्यांद्वारे केल्या जाणाऱ्या विवेकी व महत्त्वाकांक्षी खर्च विचारात घेतला जातो. हा निर्देशांक भारतातील बिझनेस-टू-कॉमर्स (बीटूसी) क्षेत्रातील अन्नेतर (नॉन-फूड) खर्चावर लक्ष केंद्रित करतो.
मिरे अॅसेट निफ्टी निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफसाठी न्यू फंड ऑफर (एनएफओ) १२ डिसेंबर, २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होणार आहे आणि २० डिसेंबर, २०२४ रोजी बंद होणार आहे. ही ऑफर २७ डिसेंबर, २०२४ रोजी सातत्यपूर्ण विक्री व फेरखरेदीसाठी पुन्हा खुली होणार आहे. त्याचवेळी मिरे अॅसेट निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफ फंड ऑफ फंडही १२ डिसेंबर, २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे आणि २६ डिसेंबर, २०२४ रोजी बंद होणार आहे. ही योजना ०३ जानेवारी, २०२५ रोजी सातत्यपूर्ण विक्री व फेरखरेदीसाठी पुन्हा खुली होणार आहे.
न्यू फंड ऑफदरम्यान किमान प्रारंभिक गुंतवणूक
दोन्ही योजनांसाठी न्यू फंड ऑफदरम्यान किमान प्रारंभिक गुंतवणूक ५,०००/- रुपये (पाच हजार रुपये) आहे, त्यानंतर १ रुपयाच्या पटींमध्ये गुंतवणूक करता येईल.मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या ईटीएफ उत्पादन विभागाचे प्रमुख व फंड व्यवस्थापक श्री. सिद्धार्थ श्रीवास्तव एनएफओ जाहीर करताना म्हणाले, ” भारतातील खर्चात लक्षणीय वेगाने वाढ होत आहेत. लोकसंख्याशास्त्रीय लाभ, नवीन युगातील कंपन्यांचा उदय, डिजिटायझेशन, अधिक उपलब्धता व वाढीव प्रवेश तसेच खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये होत असलेली वाढ हे घटक या उत्क्रांतीला चालना देत आहेत. मिरे अॅसेट निफ्टी इंडिया न्यू एज कंझम्प्शन ईटीएफ आणि फंड ऑफ फंड, या बदलाचा संभाव्य लाभ घेण्याच्या दृष्टीनेच, विकसित करण्यात आले आहेत. याद्वारे गुंतवणूकदारांना भारताच्या विवेकी व महत्त्वाकांक्षी उपभोग क्षेत्राच्या वाढीत सहभाग घेण्याची संधी पुरवली जाईल.”
गुंतवणूकीची संधी
भारत सकारात्मक वाढीचा अनुभव घेत आहे, दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २००० डॉलर्सच्या वर जात असल्यामुळे भारतीय उपभोक्त्यांचे उपभोग वाढ होत आहे आणि खर्चाच्या सवयी अधिक विवेकी व महत्त्वाकांक्षी होत आहेत. भारतीय उपभोक्त्यांना सहज तसेच व्यापक उपलब्धता निर्माण करून देणारे नवीन विभाग तसेच नवीन युगातील कंपन्यांमध्ये होणारी वाढ या उत्क्रांतीला चालना देत आहे. जून २०२४ मध्येच ग्रामीण भारतातील नागरिक मासिक खर्चाचा ५४ टक्के भाग अन्नेतर वाजवी वस्तूंवर खर्च करत असल्याचे दिसून आले आहे, तर शहरी भारतातील नागरिक त्यांच्या मासिक खर्चाचा ६१ टक्के भाग अन्नेतर वाजवी वस्तूंवर खर्च करत असल्याचे दिसून आले आहे. (स्रोत: ३० जून रोजी उपलब्ध असलेली ताजी आकडेवारी, संख्याशास्त्र व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय) दरडोई जीडीपीमध्ये झालेली वाढ; मध्यम उत्पन्न गटांतील कुटुंबांच्या संख्येतील वाढ; माल, सेवा व संधींची सहज व व्यापक उपलब्धता यांच्या जोरावर विवेकी उपभोगाचे प्रमाण आणखी वाढणे अपेक्षित आहे. भारतीय उपभोक्त्यांच्या विवेकी व महत्त्वाकांक्षी खर्चांमध्ये होणाऱ्या वाढीचा लाभ घेण्यास उत्सुक असलेले गुंतवणूकदार या नवीन योजनांमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.