सेबीने सायबर सुरक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीची मुदत वाढवली; ही असेल शेवटची मुदत
देशातील भांडवली बाजार नियामक संस्था असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) गुरुवारी (ता.५) मिष्टान्न फूड्स लिमिटेड आणि तिच्या पाच संचालकांना कथित आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूकीचे कारण देत शेअर बाजारातील प्रवेशावर बंदी घातली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने हा अंतरिम आदेश 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2024 या कालावधीत केलेल्या चौकशीनंतर दिला आहे. ज्यामध्ये कथित गंभीर आर्थिक अनियमितता समोर आली आहे.
खरेदी-विक्रीचे फुगवले आकडे
सेबीच्या आदेशानुसार, मिष्टान्न फूड्स लिमिटेडने बनावट संस्था तयार करून विक्री आणि खरेदीचे आकडे फुगवले होते. त्यापैकी अनेक कंपन्या या मिष्टान्न फूड्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हितेशकुमार गौरीशंकर पटेल आणि त्यांच्या नातेवाईकांशी जोडलेले होते. या शेल कंपन्यांचा वापर एमएफएल आणि त्याच्या सहयोगींमध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी केला गेला. ज्यामुळे सध्या कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
Farmer Success Story : 15 लाखांची नोकरी सोडली, शेतीची वाट धरली; करतायेत वार्षिक 15 कोटींची उलाढाल!
खरेदी फसवी असल्याचे उघड
सेबीच्या माहितीनुसार, सेबीच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, तपासणी कालावधीत एमएफएलच्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री आणि 84 टक्के खरेदी फसव्या असल्याचे आढळून आले आहे. ज्यात संबंधित पक्ष आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमध्ये चक्राकार पैशाचा प्रवाह आहे. नियामकाने सांगितले की 96.92 कोटी रुपये फसव्या व्यवहारांद्वारे गैरवापर केले गेले होते. ज्यामध्ये राइट्स इश्यूचा गैरवापर करण्यात आला होता. जिथे अंदाजे 75 कोटी रुपये एमएफएलच्या प्रवर्तकांशी संबंधित नसलेल्या संस्थांना हस्तांतरित करण्यात आले होते.
दरम्यान, सेबीने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, मे २०२२ मध्ये लागलेल्या आगीत सर्व रेकॉर्ड नष्ट झाल्याचा दावा करून एमएफएलने तपासात असहकार्य केल्याने कंपनीच्या हेतूवर आणखी शंका निर्माण झाली आहे.
एमसीएक्सच्या शेअर्सच्या किंमतीने गाठला 7,000 रुपयांचा टप्पा; शेअर्समध्ये ८ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ!
पुढील सूचना येईपर्यंत निधी उभारण्यास प्रतिबंध
या निष्कर्षांच्या प्रत्युत्तरात, सेबीने कंपनीला पुढील सूचना येईपर्यंत लोकांकडून कोणताही निधी उभारण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच एमएफएलच्या संचालकांना एमएफएल सिक्युरिटीजमध्ये खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून किंवा भांडवली बाजारात कोणत्याही स्वरूपात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. सेबीने कंपनीला राईट इश्यूमधून 49.82 कोटी रुपये, आणि 47.10 रुपये कोटी प्रवर्तक आणि संचालकांकडे वळवलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले आहे.
काय म्हटलंय सेबीच्या सदस्य भाटिया यांनी?
सेबीच्या पूर्णवेळ सदस्य अश्विनी भाटिया यांनी आदेशात म्हटले आहे की, फसवणूकीचे प्रमाण आणि शेअर बाजारात एमएफएलची झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, डिसेंबर 2024 पर्यंत त्यांचे बाजार भांडवल 1,600 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामुळे कंपनीच्या कारभाराबद्दल आणि गुंतवणूकदारांवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आत्मविश्वासाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.