Farmer Success Story : 15 लाखांची नोकरी सोडली, शेतीची वाट धरली; करतायेत वार्षिक 15 कोटींची उलाढाल!
सध्याच्या घडीला अनेक जण शेतीमध्ये आपले भविष्य आजमावत आहेत. त्यात अनेक इंजिनिअर्स किंवा सुशिक्षित व्यक्तींचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर या सुशिक्षितांना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका इंजिनिअर असलेल्या व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपली १५ लाख रुपये वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडून, शेतीची वाट धरली. याच शेतीच्या माध्यमातून हा सुशिक्षित शेतकरी सध्या तब्बल 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वार्षिक उलाढाल करत आहे.
वडील आणि मुलाला कर्करोगामुळे गमावले
राहुल कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील खजरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये नवीन क्रांती घडवली आहे. बीटेक आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुलने सुमारे 15 वर्षे एका पॉवर प्लांटमध्ये काम केले. परंतु त्यांनी आपल्या वडील आणि मुलाला कर्करोगासारख्या गंभीर आजाराने गमावले. त्याचवेळी त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
नैसर्गिक शेती समजून घेऊन ती प्रभावीपणे अंगीकारण्यासाठी राहुल यांनी राज्य सरकारच्या मदतीने देशातील विविध संस्था आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले. ते जीवामृत, गांडूळखत आणि नीमस्त्रासारखी सेंद्रिय उत्पादने तयार करायला शिकले आणि इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षित शेती आणि मशरूम उत्पादनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केला.
फडणवीस की शिंदे कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? वाचा… दोघांमध्ये सर्वाधिक कर्जबाजारी कोण!
कोणत्या पिकांचे उत्पादन घेतात
राहुल यांच्याकडे 10 एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मूग आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले आहे. नैसर्गिक खते आणि सेंद्रिय पद्धती वापरून त्यांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारला आहे. याशिवाय ते दूध आणि मशरूमचे उत्पादनही घेत आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, काळा गहू आणि इतर धान्यांचा समावेश असलेल्या “रसायनमुक्त नवरत्न पीठ” हे राहुलचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. हे पीठ त्यांच्या सेंद्रिय प्रक्रिया युनिटमध्ये तयार केले जाते. जे ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. या युनिटने परिसरातील 50 हून अधिक गरजूंना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
किती होतीये वार्षिक उलाढाल?
राहुल कंपनीत 15 लाखांच्या पॅकेजवर काम करत होते. आता शेती केल्यानंतर त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची उत्पादने गुरुग्राम, नोएडा, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये पाठवली जात आहेत. राहुल “श्रीराम ऑरगॅनिक फार्मर्स ग्रुप” ही कंपनी चालवतात, ज्यासोबत 600 हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. ते शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास प्रेरित करतात.
शेती क्षेत्रातील कामगिरीबद्दल मिळालाय पुरस्कार
शेती क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल राहुल यांना नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2024’ सारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 2022 मध्ये त्यांना आग्रा येथे ऑरगॅनिक इंडिया पुरस्कार मिळाला आहे. 2023 मध्ये, त्यांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सेंद्रिय शेती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.