मोबिक्विकच्या 700 कोटींच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!
गुरुग्रामस्थित कंपनी मोबिक्विकला आयपीओद्वारे 700 कोटी रुपये उभारण्याची मंजुरी मिळाली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने कंपनीला मान्यता दिली आहे. मोबिक्विक हे एक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. जे ग्राहक आणि व्यापारी यांना जोडते. कंपनीने 4 जानेवारी 2024 रोजी पुन्हा सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. सार्वजनिक सूचीसाठी मोबिक्विकचा हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी, कंपनीने 2021 मध्ये पहिला मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. त्यानंतर कंपनीला 1,900 कोटी रुपये उभे करायचे होते.
Mobikwik हे Paytm, PhonePe आणि Freecharge यासारखे पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. मात्र, तुलनेने मोबिक्विक प्रमाण लहान असून, त्याचे सुमारे 14.6 कोटी वापरकर्ते आहेत. तथापि, कंपनी पेमेंट्स, इन्स्टंट क्रेडिट आणि वैयक्तिक कर्जामध्ये एक छोटा परंतु केंद्रित फिनटेक व्यवसाय तयार करू इच्छित आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मोबिक्विकला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून त्याच्या पेमेंट गेटवे उपकंपनी Jakpay साठी पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी तत्वतः मान्यता देखील मिळाली होती.
हे देखील वाचा – सणासुदीत गोडतेल आणखी महागणार; 1 लाख टन पाम ऑईलचे करार झाले रद्द!
मोबिक्विकचा आयपीओ हा 700 कोटी रुपयांचा असणार आहे. सेबीने कंपनीला आयपीओसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मोबिक्विक कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. कंपनीला नवीन शेअर्स जारी करून, 700 कोटी रुपये उभे करायचे आहेत. नियामकाने 19 सप्टेंबर रोजी आपले ‘अंतिम निरीक्षण’ कंपनीला पाठवले होते.
मोबिक्विक प्रणाली व्यतिरिक्त, सेबीने सौर पॅनेल निर्मिती कंपनी वारी एनर्जीजच्या आयपीओला देखील मान्यता दिली आहे. वारी एनर्जीजच्या मसुद्याच्या कागदपत्रांनुसार (DRHP) प्रस्तावित आयपीओमध्ये 3,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक 32 लाख इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) देखील देतील.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)