आर्थिक सवयींमुळे होईल पैशांची बचत; व्हिसाच्या 'या' 8 टिप्स आजच फॉलो करा
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत आणि या गरजा पूर्ण होण्यासाठी लागतो तो पैसा. असं म्हणतात की लक्ष्मी आणि कुबेराला सोडून सर्वांनाच असते.या पैशांचं नियोजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सध्याच्या युगात चांगली नोकरी असणंच नाही तर आर्थिक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. स्वत:च्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन आत्मविश्वासाने करण्यासाठी अनेकदा मूलगामी बदलांची गरज नसते, तर दीर्घकाळ टिकवलेल्या सातत्यपूर्ण, व्यवहार्य सवयी भविष्यासाठी फायदेशीर ठरतात.आपल्या भविष्यकाळासाठी सुरक्षितपणे पैशांचं नियोजन कसं करावं याबाबत व्हिसाने काही टिप्स दिल्या आहेत.
1) पैशांबाबत ध्येय ठेवा :पैशांची गुंतवणूक कराताना त्याचा कालावधी निश्चित करा. एका ठराविक काळात केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी महत्त्वाची ठरते. तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल किंवा कर्ज फिटणं असेल या सगळ्यासाठी पैशांंचं नियोजन करण्यासाठी दिवसभरातील छोट्या छोट्या सेव्हिंग मासिक गुंतवणूकीवला मोठा फायदा मिळवून देतात.
2) अर्थसाक्षर व्हा : दर आठवड्याला वैयक्तिक आर्थिक नियोजनाबाबत शिकण्यासाठी फक्त ३० मिनिटांचा वेळ काढा. बचतीबाबतच्या निर्णयांसाठी, गुंतवणूकीसाठी व कर्ज व्यवस्थापनासाठी छोटे, सहज समजण्याजोगे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.
3) आर्थिक जोखीम ओळखा : डिजिटल वॉलेट्स हे आधुनिकीकरणाची वाटचाल असली तरी बँक व्यवहारांच्या तुलनेत असुरक्षित’ असतात. यांसारख्या जोखीम ओळखण्यासाठी अभ्यास करा. आर्थिक साक्षरता प्राप्त केल्यास आर्थिक नुकसान होईल अशा सायबर फसवणूकीला बळी पडू नका.
4) बजेटिंगच्या पद्धतींवर हुकूमत मिळवा: ५०/३०/२० नियमासारख्या बजेटिंगच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अनुभव घ्या. तुमच्या जीवनशैलीसाठी त्यातील कोणती पद्धत सर्वोत्तम आहे ते ठरवा. ही साधने समजून घेतल्यास आपल्याकडील पैशाचा ओघ व बचत यांवर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. खर्चावर मर्यादा घालण्याची सोय करून देणारी बँकिंग अॅपवरील साधने नक्की वापरा.
5) सुरक्षित डिजिटल पेमेंट्सचा वापर करा: ऑनलाइन खरेदी करताना, सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. अपरिचित वेबसाइट्स किंवा असुरक्षितअॅप्सवर आपले कार्डाचे तपशील वापरणे किंवा स्टोअर करणे टाळा. आपल्या कार्डावरून होणाऱ्या व्यवहारांचा इशारा देणारी यंत्रणा सक्रिय केल्यास अधिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकते.
6) वेळप्रसंगी पैशांची तरतूद :अनपेक्षितपणे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे इमरजेन्सी फंड असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनाकारण खर्च टाळून सेव्हिंग करता यायला हवी.
7) कर्जाचे व्यवस्थापन करा: उत्तम क्रेडिट स्कोअर राखण्याचा व कर्ज जबाबदारीने व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा. परतफेडीचा इतिहास चांगला असेल तर कर्ज मंजूर होणे, अधिक चांगला व्याजदर मिळणे यांसाठी तसेच आर्थिक आरोग्य चांगले राखण्यासाठी ते उपयुक्त ठरते.
8) चांगली गुंतवणूक सुरू करा: समभाग, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड्स यांसारख्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घ्या आणि दीर्घकाळात संपत्ती संचयासाठी लवकर, माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक सुरू करा. कुटुंबाच्या आणि स्वत:च्या भवितव्यासाठी पैशांची योग्यरित्या गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे फक्त साक्षर नाही तर अर्थसाक्षर होणं तितकंच महत्त्वाचं आहे.