
Mozambique LNG project halted due to terrorist attack is back on track after 53 months
सरकारी कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल) या कंपनीने जाहीर नुकताच जाहीर केले आहे की, एलएनजी प्रकल्पावरील स्थगिती ५३ महिन्यांनी उठवण्यात आली आहे. तब्बल १.७० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून भारतीय कंपन्यांचा 30 टक्के वाटा या प्रकल्पात आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे उद्भवणाऱ्या सुरक्षा चिंतेमुळे रखडलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू झाला आहे. प्रकल्पातून एलएनजी पुरवठा २०२९ पर्यंत सुरू होऊ शकतो.
प्रकल्प का थांबवण्यात आला?
उत्तरेकडील काबो डेलगाडो प्रांतात मोझांबिक एलएनजी प्रकल्प (क्षेत्र १) सुरू करण्यात आले, जिथे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. दहशतवादी हल्ल्यांमुळे बांधकामावर परिणाम झाल्याने तसेच, सुरक्षा परिस्थिती बिघडल्यामुळे मे २०२१ मध्ये त्याला स्थगिती देण्यात आली. प्रकल्पाचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले परंतु दोन वर्षांनी थांबवावे लागले. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या गॅस शोधांपैकी एक आहे.
कोणाचा किती वाटा आहे?
या प्रकल्पात सरकारी मालकीच्या ओएनजीसीचा १६% हिस्सा आहे, तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका युनिटचा १०% हिस्सा आहे. ऑइल इंडिया लिमिटेडचाही ४% हिस्सा असून या प्रकल्पात ऑफशोअर एरिया-१ मध्ये असलेल्या गोल्फिन्हो आणि अटम फील्डचा विकास आणि जहाजांद्वारे ग्राहक देशांमध्ये निर्यात करण्यासाठी गॅसचे द्रवीकृत नैसर्गिक वायू मध्ये रूपांतर करणारे प्लांट बांधणे समाविष्ट आहे.
भारतासाठी हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे?
भारतासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. कारण, भारतात एलएनजीचा पुरवठा सुलभ होईल, जो फक्त ३ ते ७ दिवसांत तेथे पोहोचेल. सध्या, हा प्रकल्प २०२६-२७ मध्ये कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे, जे मूळतः २०२४ साठी नियोजित होते. एकदा हा प्रकल्प कार्यान्वित झाला की, तो भारतीय कंपन्यांना देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास लक्षणीय मदत करेल.