Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) कडून क्वालिटी केअर इंडिया लिमिटेडला ‘लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स’ (LoA) प्रदान करण्यात आले. यामुळे जवळपास 6300 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 07:36 PM
“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन
Follow Us
Close
Follow Us:

‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे फडणवीसांच्या हस्ते उदघाटन 
नागपूरमध्ये सुरू आहे ॲडव्हांटेज विदर्भ 2026 महोत्सव 
नागपूर भारतातील सर्वात मोठे सौर मॉड्यूल उत्पादन केंद्र

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, स्टार्टअप इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी असून आता विदर्भही महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारा प्रदेश बनत आहे. सौर उर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला असून नागपूर परिसर भारतातील सर्वात मोठे सौर मॉड्यूल उत्पादन केंद्र बनत आहे.

ग्रीन स्टीलसाठी आवश्यक संपूर्ण इकोसिस्टम उभारण्याचे उद्दिष्ट असून कोळसा व खनिज संपत्तीच्या आधारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औद्योगिक परिवर्तन साध्य करण्यावर भर आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात महाराष्ट्र मोठी झेप घेत आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ ही चार प्रमुख केंद्रे विकसित होत आहेत. सर्क्युलर इकॉनॉमी व सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया व AI आधारित शेती क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

“५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

येत्या काळात विविध क्षेत्रांसाठी नवीन धोरणे जाहीर केली जातील. धोरणाधारित गुंतवणूक व औद्योगिक विकास ही महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रमुख दिशा आहे. महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

'इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह'च्या माध्यमातून विकसित विदर्भाची पायाभरणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'ॲडव्हांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव' अंतर्गत आयोजित 'इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह'चे उदघाटन केले. यावेळी… pic.twitter.com/BwhUkeRjYt — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 7, 2026

याशिवाय महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) कडून क्वालिटी केअर इंडिया लिमिटेडला ‘लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स’ (LoA) प्रदान करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्र शासनाने गॅलेक्सी सोलर व जीआर इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यासोबत सामंजस्य करार केले. या करारांमुळे ₹10,831 कोटींची गुंतवणूक येणार असून जवळपास 6300 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यावेळी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, 22 हून अधिक देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच राजनयिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले.

Web Title: International business conclave was inaugurated by cm devendra fadnavis nagpur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur

संबंधित बातम्या

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
1

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Bank of India FD Rates: कमाईची मोठी संधी! बँक ऑफ इंडियाचे नवे FD दर जाहीर , जाणून घ्या किती होईल फायदा
2

Bank of India FD Rates: कमाईची मोठी संधी! बँक ऑफ इंडियाचे नवे FD दर जाहीर , जाणून घ्या किती होईल फायदा

Nana Patekar : नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ
3

Nana Patekar : नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला
4

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.