
NCDEX Update: एनसीडीईएक्सचा होणार मोठा विस्तार! म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मंजुरी
NCDEX Update: नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज म्हणजेच एनसीडीईएक्सला म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे लहान शहरांतील बचतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. भारतातील आघाडीचे एनसीडीईएक्स हे कमोडिटी एक्सचेंज आहे, जे कृषी कमोडिटीज फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये व्यापार करतात. जसे की, शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया करणारे, निर्यातदार आणि गुंतवणूकदार धान्य, डाळी, तेलबिया, मसाले आणि इतर कृषी उत्पादनांमध्ये किंमती निश्चित करण्यासाठी आणि जोखीम रोखण्यासाठी NCDEX वर व्यापार करतात.
सेबीने मंजूरी दिल्यामुळे एनसीडीईएक्ससाठी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये उतरण्यासाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्लॅटफॉर्मवरील म्युच्युअल फंड व्यवहार इक्विटी ट्रेडिंगपासून वेगळे केल्याने ऑपरेशनल सोय सुनिश्चित होईल. एनसीडीईएक्सचा असा विश्वास आहे की, ते अल्पावधीत ही सेवा सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे.
एनसीडीईएक्सची असलेली उपकंपनी एनईसीएल यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. नवीन गुंतवणूकदारांना बाजारात आकर्षित करण्यासाठी तीव्र प्रयत्न होत असताना ही घोषणा केल्याने ग्रामीण भागातील आणि लहान शहरांमधील लोकांना गुंतवणुकीच्या जगात सहजपणे प्रवेश करता येईल. एनसीडीईएक्सचे सीईओ डॉ. अरुण रास्ते याबद्दल बोलताना म्हणाले की, इक्विटी मार्केट लाँच करण्यापूर्वी म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म लाँच करणे हा एक विचारपूर्वक आणि वेळेवर घेतलेला निर्णय आहे. नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. तसेच, भारतात इक्विटी गुंतवणूक सुरू होत असल्याचा त्यांना विश्वास आहे.
या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये बचतीचे माध्यम बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यवस्थापित आणि फायदेशीर गुंतवणुकीत या बचती गुंतवल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्यामुळे गुंतवणूकदरांना लघु-मूल्याच्या सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) आणि सुरक्षित एक्सचेंज-आधारित प्रणाली गुंतवणूक करणे सोपे जाईल. हे पाऊल एनसीडीईएक्सला विस्तृत श्रेणीतील मालमत्ता असलेल्या प्लॅटफॉर्मकडे जात असून गुंतवणूकदारांसाठी नक्कीच वरदान ठरेल.
ग्रामीण भारतासाठी गुंतवणुकीचा नवा मार्ग