
Todays Gold-Silver Price: ख्रिसमसवर सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर
सोने कर्ज पारंपारिक कर्जांच्या तुलनेत सरल आणि सोप्पे आहे. यामध्ये जास्त वाट पाहण्याची किंवा जड कागदपत्रांची गरज नाही. फक्त महत्वाची कागदपत्र असतील तरी चालतात. अनेक बँका आणि एनबीएफसी योग्य कागदपत्र मिळण्यावर त्वरित कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यामुळे आणीबाणीच्या काळात त्याची मदत होते. म्हणूनच कठीण काळात सोने कर्ज जास्त प्राधान्य दिले जाते. आणि सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक केली जाते.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले! जाणून घ्या सविस्तर
सोने कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज देताना क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जात नाही. क्रेडिट स्कोअर कमी असला किंवा अजिबात स्कोअर नसला तरीही, तुम्हाला कर्ज मिळू शकते. कारण तुमचे सोने सुरक्षा म्हणून बँका आणि वित्तपुरवठादार गहाण ठेवतात. यामुळे हा पर्याय अशा लोकांनाही उपलब्ध होतो ज्यांच्याकडे कायमस्वरूपी रोजगाराचा पुरावा किंवा उत्पन्नाचे कागदपत्रे नाहीत. फ्रीलांसर, लघु व्यवसाय आणि असंघटित क्षेत्रातील लोक या सुविधेचा सहज लाभ घेऊ शकतात.
सोने कर्ज देताना प्रामुख्याने तीन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. तुमच्या सोन्याचे वजन, त्याची शुद्धता आणि तुमचे वय जे किमान 18 वर्ष पूर्ण हवे. सोने कर्ज देताना १८ ते २४ कॅरेट सामान्यतः स्वीकारले जाते. कर्जाची परतफेड केल्यानंतर, सोने त्याच स्थितीत परत केले जाते, ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि गरजेच्या वेळी उपयुक्त ठरते.
सोने कर्ज फेडताना तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसे की, तुम्ही ईएमआय निवडू शकता, फक्त व्याज आगाऊ भरू शकता किंवा मुदतीच्या शेवटी एकरकमी पेमेंट करू शकता. काही ठिकाणच्या संस्था कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रीपेमेंट पर्याय देखील देतात. सोने कर्ज घेताना सोन्याची सुरक्षा सुद्धा महत्वाची असते. मात्र, जर तुम्ही सोने कर्ज बँका आणि एनबीएफसी घेतले तर तिथे सोने सुरक्षित तिजोरीत आणि विमा संरक्षणाखाली साठवतात, ज्यामुळे चोरी किंवा हरवण्याचा धोका कमी होतो. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सोने सुरक्षित राहते आणि पूर्ण झाल्यावर त्याचे सुरक्षित परतफेड सुनिश्चित केली जाते.