When will PM Kisan's Rs 2000 arrive in farmers' accounts? (फोटो-सोशल मीडिया)
PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. PM kisan सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार आहे. फेब्रुवारी 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असून एका वर्षात 3 समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवण्यात येतील. आतापर्यंत या योजने अंतर्गत 20 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जलए आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील दिलेल्या माहितीनुसार 21 वा हप्ता 19 नोव्हेंबरला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 18 हजार कोटी रुपये पाठवले जातील. पूरग्रस्त राज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता आधीच देण्यात आला आहे. उत्तर भारतीय अर्थात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधीच आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत हप्ता दिला आहे.
आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून तब्बल 3.70 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आतापर्यंत 20 हप्त्यांचे एकूण 40 हजार रुपये मिळाले आहे. पीएम किसान योजनेत कमीत कमी दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी आहे. 2 ऑगस्टला पीएम किसान 20 व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. ज्यात 9.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20500 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले होते.
हेही वाचा : PM Kisan Scheme : पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळणार लवकरच! त्यासाठी कशी करणार e-kyc
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक
शेतकऱ्यांना 21वा हप्ता हवा असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला येणार नाही. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट किंवा सीएससी सेंटरवर शेतकरी ई केवायसी करू शकतात. शेतकरी त्यांच्या बायोमेट्रिक ई केवायसी किंवा ओटीपी आधारित ई केवायसी करू शकतात. त्याचबरोबर फेस आधारित ई केवायसी हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.






