आता कर्ज मिळणे झाले सोपे... यूपीआयनंतर रिझर्व्ह बॅंक कर्जदारांसाठी आणतीये 'ही' सुविधा!
यूपीआय या डिजीटल पेमेंट सुविधेनंतर आता भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) युएलआय ही सुविधा आणत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस आयडेंटिटीच्या माध्यमातून भारतातील डिजीटल व्यवहारांमध्ये क्रांती घडून आली आहे. अशातच आता युएलआय (युनिफाइट लेंडीग इंटरफेस) या सुविधेद्वारे आरबीआय डिजीटल क्रेडीटच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलाला आरबीआयने युनिफाइट लेंडीग इंटरफेस (युएलआय) असे नाव दिले आहे.
काय आहे ही युएलआय सुविधा
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बंगळुरू येथील डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर एंड इमर्जिंग टेक्नोलॉजीज संबंधित कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. आरबीआय सध्या फ्रिक्शनलेस क्रेडिटसाठी युएलआय (युनिफाइट लेंडीग इंटरफेस) चे तंत्रज्ञान प्लॅटफार्मचा पायलट प्रोजेक्ट चालवत आहे. ज्यामध्ये बॅंक ग्राहकांचे कर्ज मंजुर करण्यासाठी सिस्टिमला सुव्यवस्थित केले जाणार आहे. ज्यामुळे देशभरातील नागरिकांना कमी वेळेत कर्ज घेणे शक्य होणार आहे. अल्प प्रमाणात कर्ज घेणाऱ्यांना या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा – कोणतेही काम न करता मिळतोय गलेलठ्ठ पगार; वाचा… कोण आहे ‘हा’ नशीबवान कर्मचारी
पायलट प्रोजेक्टनंतर देशभरात सुरू होणार
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे की, पायलट प्रोजेक्टच्या निष्कर्षानंतर युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (ULI) लवकरच देशभरात सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठा बदल घडवून आणण्यात युपीआय पेमेंट प्रणाली यशस्वी ठरली आहे. त्याचप्रमाणे युनिफाइड लेंडिंग इंटरफेस ही सुविधा भारतातील कर्ज देण्याच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार आहे. दरम्यान, देशातील जेएएम, युपीआय, युएलआय हे त्रिकूट भारताच्या डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – 42,141 कोटींचा मालक आहे, अमिताभ बच्चन यांचा जावई, शेतकऱ्यांसाठी करतो ‘हा’ बिझनेस
कृषी क्षेत्राला सर्वाधिक फायदा होणार
या प्लॅटफॉर्ममध्ये कर्ज देणाऱ्या संस्थांकडे विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदी देखील असतील. ज्यामुळे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना कमी वेळेत सहजरित्या कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्ज देणाऱ्या संस्थेला एकाच ठिकाणी ग्राहकांची सर्व माहिती मिळणार आहे.अर्थात युनिफाइड लेंडिंग इंटरफेस सुविधेमुळे कर्ज न मिळणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना चटकन कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.