कोणतेही काम न करता मिळतोय गलेलठ्ठ पगार; वाचा... कोण आहे 'हा' नशीबवान कर्मचारी
नोकरी सरकारी असो वा खासगी, आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वांना कठोर परिश्रम करावे लागते. दिलेल्या वेळेत दिलेले काम योग्य रित्या पार पाडावे लागते. यासाठी नोकरी करताना मोठे कष्ट करावे लागते. पण, फक्त कल्पना करा की तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला पगार मिळत राहतो, असा विचार करणेही अवघड वाटते. पण, असाच काहीसा प्रकार ॲमेझॉनच्या एका कर्मचाऱ्यासोबत घडला आहे. जवळपास वर्षभरापासून आपण काहीच करत नसल्याचा दावा त्या कर्मचाऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे असे असतानाही सतत पगार मिळत आहे.
ब्लाइंड ॲपवर सांगितली उघडपणे माहिती
ॲमेझॉनच्या या वरिष्ठ कर्मचाऱ्याने ब्लाइंड ॲपवर याबाबत उघडपणे सांगितले आहे. या ॲपवर कर्मचारी त्यांची ओळख न सांगता एकमेकांशी बोलू शकतात. या अधिकाऱ्याची ही कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने लिहिले की, मी सुमारे दीड वर्षांपासून ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मला गुगल कर्मचारी कपातीदरम्यान काढून टाकण्यात आले. यानंतर मी ॲमेझॉनवर आलो. इतका वेळ मी इथे रोजच वेळ घालवला आहे. आजपर्यंत मी कोणतेही काम केलेले नाही, तरी देखील मला पगार मिळत असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा – 42,141 कोटींचा मालक आहे, अभिताभ बच्चन यांचा जावई, शेतकऱ्यांसाठी करतो ‘हा’ बिझनेस
कामाचा बराच वेळ बैठकांमध्ये जातो
कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इतके दिवस मी काहीही न करता ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मी दर आठवड्याला 8 तास माझी ड्युटी करतो. यातील बहुतांश वेळ मीटिंगमध्ये जातो. मी काहीही अतिशयोक्ती करत नाही. या प्रदीर्घ काळात मी फक्त 7 समस्या सोडवल्या आहेत.
यावेळी, मी एक डॅशबोर्ड तयार केला आणि तो कंपनीला दिला. जो चॅटजीपीटीच्या मदतीने केवळ 3 दिवसांत तयार झाला. तथापि, मी माझ्या कंपनीला सांगितले आहे की ते तयार करण्यासाठी 3 महिने लागले. त्यामुळे आपल्याला कोणतेही विशेष असे काम कंपनीत नसते.
many such cases pic.twitter.com/4o32Qq7JKE
— anpaure (@anpaure) August 23, 2024
दीड वर्षात घेतलाय 3.1 कोटी रुपयांचा पगार
दीड वर्षाच्या काळात मी 3.1 कोटी रुपयांचा पगार घेतल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे. आहे. या काळात मी विशेष कोणतेही काम केले नसल्याचे सांगितले. हे काम किती दिवस चालेल माहीत नाही. या पोस्टला अंदाजे 30 हजार व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, माझा भाऊ ड्रीम जॉब करत आहे. दुसऱ्याने कमेंट केली आहे की, तुमचे आभार, मला असे वाटते की मला पगार कमी आणि काम जास्त आहे. मला तुझा हेवा वाटतो. मोठ्या पदावर काम करावे.