Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता संपूर्ण जग पिणार अमुलचे दूध; अमेरिकेनंतर युरोपीय बाजारात उतरणार ब्रॅंड!

चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेतील यशस्वी पदार्पणानंतर आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता जगभर अमुलचे दुध पिले जाणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 07, 2024 | 03:24 PM
आता संपुर्ण जग पिणार अमुलचे दुध; अमेरिकेनंतर युरोपीय बाजारात उतरणार ब्रॅंड!

आता संपुर्ण जग पिणार अमुलचे दुध; अमेरिकेनंतर युरोपीय बाजारात उतरणार ब्रॅंड!

Follow Us
Close
Follow Us:

आजपर्यंत तुम्ही अमुल दुध पिता हैं इंडिया… ही जाहिरात अनेकदा पाहिली असेल, ऐकली असेल. मात्र, आता हाच अमुल दुधाचा ब्रॅंड जगभर आपला झेंडा गाडणार आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेतील यशस्वी पदार्पणानंतर आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता जगभर अमुलचे दुध पिले जाणार आहे.

जयेन मेहता यांची माहिती

अमूल ब्रँड गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नावाच्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाखाली चालवला जातो. या असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटले आहे की, अमूल दूध काही महिन्यांपूर्वी अमेरिकी बाजारात उपलब्ध झाले. त्या ठिकाणी नागरिकांना ते खूप आवडले. कंपनीचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता अमूल दूध युरोपियन बाजारपेठेत उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.

एक्सएलआरआयने आयोजित केलेल्या 11 व्या डॉ. वर्गीस कुरियन मेमोरियल लेक्चरमध्ये मेहता यांनी ही माहिती दिली आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे. तसेच जगातील एकूण दुधापैकी एक तृतीयांश दूध येत्या काही वर्षांत देशात तयार होईल. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

हे देखील वाचा – भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; ‘इतके’ वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!

6 महिन्यात अमेरिकेत झेंडा गाडला

अमूलने या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये अमेरिकेत प्रवेश केला होता. अमूलने अमेरिकेत दुधाचे चार प्रकार लाँन्च केले होते. यामध्ये अमूल फ्रेश, अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल स्लिम अँड ट्रिम यांचा समावेश होता. यासाठी अमूलने मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत भागीदारी केली होती. ही अमेरिकेची 108 वर्षे जुनी डेअरी सहकारी संस्था आहे.

डेअरी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेसाठी मोठे योगदान

दूध केवळ आरोग्य सुधारत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा घडवून आणते. बहुतेक ग्रामीण लोकांसाठी दूध उत्पादन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय क्षेत्राचे योगदान ५ टक्के आहे. सुमारे 8 कोटी शेतकरी या व्यवसायाशी निगडीत आहेत. तज्ज्ञांच्या मते, पुढील 5 वर्षांत देशातील दुग्धव्यवसायात 15 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येईल. अनेक डेअरी संबंधित स्टार्टअप्सही उत्कृष्ट काम करत आहेत.

80 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय

अमूलला त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून दरवर्षी प्रचंड उत्पन्न मिळते. मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अमुलची वार्षिक उलाढाल सुमारे 80 हजार कोटी रुपये होती. अमूलचे देशभरात 107 डेअरी प्लांट आहेत. ब्रँड 50 हून अधिक उत्पादने विकतो. दररोज 310 लाख लिटर दूध अमुल शेतकऱ्यांकडून गोळा करतो. देशभरात दरवर्षी अमूलची सुमारे २२ अब्ज पॅकेट विकली जातात. 35 लाखांहून अधिक शेतकरी या अमुलशी थेट जोडली गेली आहेत.

Web Title: Now the whole world will drink amuls milk after america the brand will enter the european market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • Amul Milk

संबंधित बातम्या

1st May 2025: दुधापासून रेल्वे तिकिटापर्यंत आजपासून सगळं बदलणार! सामान्यांना दिलासा मिळणार की खिशाला कात्री बसणार?
1

1st May 2025: दुधापासून रेल्वे तिकिटापर्यंत आजपासून सगळं बदलणार! सामान्यांना दिलासा मिळणार की खिशाला कात्री बसणार?

मदर डेअरीनंतर आता ‘या’ कंपनीने केली दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ, 1 मे पासून नवे दर लागू
2

मदर डेअरीनंतर आता ‘या’ कंपनीने केली दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ, 1 मे पासून नवे दर लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.