भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; 'इतके' वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!
केंद्र सरकारकडून देशभरातील गरिबांना स्वस्तात पीठ, तांदूळ आणि डाळी पुरवल्या जातात. ज्यामुळे अनेकांना आपले कुटूंब व्यवस्थित चालण्यास मदत होते. मात्र, आता सरकारकडून या स्वस्तात वितरित केल्या जाणाऱ्या भारत आटा, तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढवल्या जाणार आहे. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात तुमच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडणार आहे. नुकतीच या स्वस्तातील भारत आटा, तांदूळ आणि डाळींच्या किमती वाढवण्याबाबत सरकारच्या मंत्रिमंडळाने चर्चा केली असून, लवकरच वाढलेल्या किंमतीत त्यांची विक्री सुरू केली जाणार असल्याचे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे.
देशभरातील सर्वसामान्यांसाठी धक्का देणारी ही बातमी आहे. सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेनुसार भारत आटा, तांदूळ, डाळ हे सर्व वाढलेल्या किमतीत विकले जाणार आहेत. आठवडाभरात त्यांची विक्री सुरू होईल. मात्र, यासाठी लोकांना अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
काय असतील नवीन किंमती
– 10 किलो गहू पिठाची किंमत 275 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
– 10 किलो तांदळाची किंमत 295 रुपयांवरून 320 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
– 1 किलो हरभरा डाळीची किंमत 60 रुपयांवरून 70 रुपये किलो होणार आहे.
दरम्यान, भारत डाळ (मूग) चा दर 107 रुपये प्रति किलो ठेवला जाऊ शकतो. आणि यावेळी स्वस्त खाद्यपदार्थांच्या यादीत भारत डाळ (मसूर) समाविष्ट केली जाऊ शकते. यासाठी 89 रुपये दर निश्चित केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा – वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; ‘ही’ महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!
काय आहे सरकारचा प्लॅन?
सरकारला सध्या सरकारच्या राखीव कोट्यात असलेला जास्तीत जास्त तांदुळ वितरित करायचा आहे. एकीकडे सरकारला तांदळाच्या अनुदानावर फारसा खर्च करायचा नाही, तर दुसरीकडे स्टॉकमध्ये ठेवलेल्या तांदळाचा मोठा पुरवठाही समायोजित करायचा आहे. त्याचवेळी, विपणन वर्ष 2024-25 साठी नवीन सरकारी खरेदी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत गोदाम रिकामे करण्याचा दबाव असेल, जेणेकरून नवीन तांदूळ आणि गहू पिके ठेवण्यासाठी जागा निर्माण करता येईल. असेही सरकारी सुत्रांकडून सांगितले जात आहे.