Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कर्ज मिळणार फक्त 6 मिनिटांत! ओएनडीसी या सरकारी कंपनीची नवी डिजिटल पेपरलेस कर्ज सुविधा

आता सर्वसामान्यांना केवळ ६ मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे. ओएनडीसी (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) या भारत सरकारच्या कंपनीकडून ओपन नेटवर्कतर्फे हे संपूर्ण डिजिटल, पेपरलेस कर्ज केवळ ६ मिनिटांत उपलब्ध केले जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 22, 2024 | 05:15 PM
आता कर्ज मिळणार फक्त 6 मिनिटांत! ओएनडीसी या सरकारी कंपनीची नवी डिजिटल पेपरलेस कर्ज सुविधा
Follow Us
Follow Us:

ओएनडीसी (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) या भारत सरकारची कंपनी आता या ओपन नेटवर्कतर्फे  कर्ज देण्यास सुरुवात केली असून फक्त ६ मिनिटांत संपूर्ण डिजिटल, पेपरलेस कर्ज सुविधा सादर केली आहे. त्यामुळे सर्वसामांन्याना तात्काळ कर्ज उपलब्ध होणार आहे.  या नवीन उपक्रमामध्ये ९ खरेदीदार अ‍ॅप्लिकेशन्स (ज्यांना कर्ज सेवा प्रदाता म्हणतात) आणि ३ कर्जदाता आहेत. कर्ज सेवा क्षेत्रात पोहोच आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या ओएनडीसी नेटवर्कच्या मिशनमधला हा एक लक्षणीय टप्पा आहे. विशेष म्हणजे ओएनडीसीने (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) ईकॉमर्सवर १२ दशलक्ष  मासिक व्यवहारांचा पल्ला पार केला आहे.

कर्ज सुविधा अ‍ॅप्लिकेशन्स आणि कर्जदाता

पगारदार आणि स्व-रोजगार मिळवणाऱ्या व्यक्तींसाठीचे सुरक्षित कर्ज हे या डिजिटल कर्ज उपक्रमातील प्रारंभिक उत्पादन आहे. यातील खरेदीदार अ‍ॅप्लिकेशन्समध्ये ईझीपे, पैसाबझार, टाटा डिजिटल, इनव्हॉईसपे, क्लिनिक३६०, झ्यापार, इन्डीपे, टायरप्लेक्स आणि पेनीयरबाय यांचा समावेश आहे, तर कर्ज देणाऱ्यांत आदित्य बिर्ला फायनान्स, डीएमआय फायनान्स आणि कर्नाटक बँकेचा समावेश आहे.

कर्ज प्रक्रियेतील घटक 

केवळ ६मिनिटांत, कागदाचा वापर न करता, डिजिटल माध्यमातून कर्ज देण्यासाठी या संपूर्ण कर्ज प्रक्रियेत ४ डिजिटल पब्लिक गुड्सचा उपयोग केला जातो. डेटा साठी अकाऊंट अ‍ॅग्रीगेटर,केवायसीसाठी डिजीलॉकर / आधार, परतफेडीसाठी ईएनएसीएच / ईमॅण्डेट आणि कारारावरील सहीसाठी आधार ई-साईन. यामुळे, दूरस्थ आणि वंचित क्षेत्रांपर्यंत कर्ज सुविधा पोहोचू शकेल आणि भारतात डिजिटल कर्ज क्रांती घडून येईल.

देशात आर्थिक समावेशकता वाढेल

ओएनडीसीचे एमडी आणि सीईओ टी. कोशी म्हणाले, “सदर घडामोड हे कर्ज उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्यातील मोठे पाऊल आहे. एकाच प्रक्रियेत विविध डिजिटल प्रणालींचा समावेश करून आम्ही कर्ज घेण्याचा अनुभव सुलभ करत आहोत आणि सुदूर आणि वंचित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांपर्यंत कर्ज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या इनोव्हेशनमुळे कर्जदाता आणि बायर अ‍ॅप्लिकेशन्स या दोघांसाठी कार्यकारी खर्च तर कमी होईलच, पण देशभरात आर्थिक समावेशकता वाढेल, आर्थिक विकासाला गती मिळेल आणि संधी वाढतील. समावेशकतेच्या ओएनडीसी च्या व्हिजनला धरूनच हे इनोव्हेशन आहे आणि आता आर्थिक समवेशापर्यंत ते विस्तारित झाले आहे.

ही नवीन डिजिटल कर्ज प्रक्रिया सुलभतेने आणि झटपट कर्ज देऊन मोठा प्रभाव निर्माण करणार आहे. ओएनडीसी प्रोटोकॉलने प्रदान केलेल्या प्रमाणित चौकटीच्या आधारावर कर्जदाता आणि बायर अ‍ॅप्लिकेशन्स हे दोघेही अधिक कार्यक्षम होऊन आपली पोहोच वाढवू शकतील. विविध वितरण बिंदूंचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी कर्जदात्यांना फक्त ओएनडीसी प्रोटोकॉल अंगिकारावा लागेल. त्याचप्रमाणे, ओएनडीसी प्रोटोकॉलच्या मदतीने बायर अ‍ॅप्लिकेशन्सना केवळ एका इंटीग्रेशनने विविध कर्जदात्यांपर्यंतचा अ‍ॅक्सेस मिळेल.

या कर्ज सुविधे साठी हे अ‍ॅप्लिकेशन्स आणि बॅंकाही उत्सुक

या डिजिटल कर्ज मॉडेलचा विस्तार करण्यात स्वारस्य असलेल्या मोबीविक, रूपीबॉस आणि समृद्ध.एआय सारख्या अनेक खरेदीदार अ‍ॅप्लिकेशन्स आहेत तसेच एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फेअरसेंट, पहल फायनॅन्स, फाईब, टाटा कॅपिटल, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस फायनॅन्स, एफटी कॅश आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारखे कर्जदाते आहेत.

 

Web Title: Now you can get a loan in just 6 minutes digital paperless loan facility by government company ondc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 05:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.