फोटो सौजन्य- सोशल मीडिया
आजच्या काळात आपण सर्वच डिजीटल पेंमेंटचा वापर करतो. अनेकदा आपल्याकडे कॅशही नसते कारण आपण डिजीटल पेंमेंटलाच प्राधान्य देत आहोत. डिजीटल पेमेंट करताना आपण UPI चा वापर करतो. या UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेससंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. UPI मी मुळ कंपनी असणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने आता ऑनलाइन पेमेंट मर्यादा ही तब्बल 5 लाख रुपये केली आहे. ही सुविधा विशिष्ट श्रेणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जाणून घेऊया या सुविधेबद्दल
मीडिया रिपोर्टनुसार UPI ची 5 लाख रुपये पेंमेंट सुविधा ही उद्या दि. 15 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. म्हणजे उद्यापासून ग्राहक UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंत सहज पेमेंट करू शकणार आहेत. NPCI तर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, UPIमध्ये विशिष्ट श्रेणींसाठी प्रति व्यवहार मर्यादा वाढवण्याची आवश्यकता बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. हे लक्षात घेता , NPCI ने सर्व बँका, PSPs (Payment Service Provider) आणि UPI ॲप्सना ऑनलाइन पेमेंटसाठी काही ठराविक श्रेणींमध्ये व्यवहार मर्यादा वाढवली आहे. तसेच त्यासंबंधी निर्देश दिले आहे.
यासाठी करु शकता 5 लाख रुपयांपर्यंत पेंमेंट
उद्यापासून म्हणजेच 15 सप्टेंबरपासून, UPI वापरकर्ते एकावेळी 5 लाख रुपये ट्रान्सफर करु शकतील. कर भरणा, रुग्णालयाचे बिल, शैक्षणिक सेवा आणि IPO यासाठी एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. यामुळे रुग्णालयाचे बील त्यामुळे तात्काळ बील भरता येऊ शकते. तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये पैसे 5 लाखांपर्यंत पैसे भरणेही सहज शक्य होणार आहे. सध्या शेअर बाजारात दिवसेंदिवस नवनवे आयपीओ येत असतात त्याकरिताही जास्त रक्कमचे पेमेंट करता येईल.
हे देखील वाचा- भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार; ‘या’ कंपनीमध्ये करतात गुंतवणूक
UPI व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ
सरकारकडून सातत्याने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. दिवसेंदिवस युपीआयद्वारे होणारे व्यवहारही वाढत आहे. अगदी सामान्य भाजी विक्रेत्यापासून मोठ्या शो रुम पर्यंत तुम्ही युपीआय पेंमेंट करु शकता. यामुळे रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे ठरतात.