फोटो सौजन्य- iStock
आजच्या काळात गुंतवणूकीचे महत्व सामान्य माणसाला पटू लागले आहे. योग्य गुंतवणूकीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळतो ज्याद्वारे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली बनवू शकता. भविष्यात तुमची आणि तुमच्या कुंटुंबाची स्वप्न पूर्ण करु शकता. आपण जर दिवसाला थोडी जरी बचत केली तर त्याचा परतावा कमालीचा असू शकतो. हा परतावा तुम्हाला लखपती ते करोडपती बनवू शकतो. खरंच फक्त गुतवणूकीत सातत्य महत्वाचे आहे.
आपण केवळ दिवसाचे 20 रुपयांची बचत केली तर ती महिन्या काठी 600 रुपये होते ती बचतीची दर महिन्याला योग्य गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपतीही बनू शकता. या 20 रुपयांच्या बचतीसाठी तुम्हाला फार ओढाताण करण्याची नक्कीच गरज नाही तुम्ही तुमची जीवनशैलीही आहे तशी ठेऊ शकता. तर जाणून घेऊया या 20 रुपयाच्या गुंतवणूकीमुळे कशी कमाल होऊ शकते
20 रुपयाच्या गुंतवणूकीतून मिळेल एक कोटीचा परतावा
दर दिवसाला 20 प्रमाणे महिन्याला 600 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्ही म्युच्युअल फंडच्या एसआयपी मध्ये गुतविले तर तुम्हाला कमालीचा परतावा मिळू शकतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक ही दीर्घकालासाठी करणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला म्युच्युअल फंड एसआयपीवर साधारण 12 ते 18 टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. या एसआयपीमध्ये तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका तुमचा परतावा जास्त आहे. उदाहरणार्थ जर आता पासून तुम्ही 600 रुपये गुंतवणूकीस सुरु केल्यास तुम्हाला 18 टक्क्याच्या व्याजाच्या दराने 31 वर्षात या पैशांचे 1 कोटी 2 लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते. यामध्ये तुम्ही 2 लाख 23 हजार 200 रुपयांची गुंतवणूक केली आहे. हीच 600 रुपयांची गुंतवणूक जर तुम्ही 40 वर्षासाठी केलात तर तुम्हाला 5.15 कोटी रुपये मिळू शकता.आपण जर व्याजदर 15 टक्के जरी ठेवला तरी तुम्हाला 36 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 कोटीहून जास्त रक्कम मिळू शकते. तुम्हीही आम्ही सांगितलेल्या परताव्याची ऑनलाईन कॅलक्युलेटरद्वारे पडताळणी करु शकता.
म्युच्युअल फंडामधील एसआयपीची गुंतवणूक ही चक्रवाढ व्याजासह दीर्घकाळात मोठ्या फंडांमध्ये बदलते.तसेच कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुतंवणूक करत आहात हे ही महत्वाचे असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते या गुंतवणूकीवर शेअर बाजारातील अस्थिरतेचा परताव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे.