
NPCI UPI Vyapar Sashakt Yojana (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
NPCI UPI Vyapar Sashakt Yojana: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने छोट्या दुकानदारांमध्ये डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी ‘UPI व्यापार सक्षम योजना’ सुरू केली आहे.आजकाल कुठेही जा, चहाची टपरी असो, भाजीची गाडी असो, किराणा दुकान असो, सगळीकडे QR कोड लागलेला दिसतो. लोक आता खिशात पैसे ठेवतच नाहीत, मोबाईलवरूनच पेमेंट करतात. पण अजूनही असे खूप छोटे दुकानदार आहेत, जे या डिजिटलच्या भानगडीत पडलेलेच नाहीत. त्यांना वाटतं, हे आपलं काम नाही, खर्च जास्त येईल, जमणार नाही.
म्हणूनच NPCI ने म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन योजना आणलीय. तिचं नाव आहे ‘UPI व्यापार सक्षम योजना’. या योजनेत छोट्या दुकानदारांच्या दुकानात QR कोड लावायला आणि साऊंडबॉक्स बसवायला पैसे दिले जाणार आहेत. बँकेमार्फत हे पैसे मिळतील.
या नवीन योजनेचा लाभ देशातील तळागाळातील लहान व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.सोपं सांगायचं तर, ज्या दुकानदाराची वर्षाची उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंत आहे, तो या योजनेसाठी पात्र आहे. 40 लाखांपर्यंत उलाढाल म्हणजे महिन्याला साधारण 3 लाखापर्यंतचा धंदा. यात जुने दुकानदार पण येतील आणि नवीन दुकान टाकणारे पण येतील. दोघांनाही फायदा मिळेल.
या योजनेत खास करून छोट्या शहरांना आणि गावांना जास्त महत्त्व दिलंय. टियर-3 ते टियर-6 म्हणजे लहान शहरे आणि ग्रामीण भागातल्या दुकानदारांना आधी फायदा दिला जाणार आहे. तसेच, ईशान्येकडील राज्ये, जम्मू-कश्मीर आणि लडाखमधील व्यापाऱ्यांसाठी विशेष लक्ष दिलंय. मोठ्या शहरातले छोटे दुकानदार, जे केंद्र सरकारच्या दुसऱ्या योजनांमध्ये आहेत, त्यांना पण याचा फायदा घेता येणार आहे.
NPCI ने या योजनेच्या एकूण निधीपैकी 30% रक्कम ही नवीन व्यापाऱ्यांना डिजिटल प्रणालीशी जोडण्यासाठी राखून ठेवली आहे. म्हणजे एकूण पैशातले 30 टक्के पैसे फक्त नवीन दुकानदारांना जोडण्यासाठी ठेवलेत. जर एखाद्या नवीन दुकानदाराने त्याच्या दुकानात QR कोड लावला, तर त्याला 300 रुपये मिळतील. जर साऊंडबॉक्स बसवला, तर 750 रुपये मिळतील. साऊंडबॉक्स म्हणजे तो छोटा डबा, ज्यातून “50 रुपये प्राप्त झाले” असा आवाज येतो. त्यामुळे दुकानदाराला कळतं, पैसे आलेत. पण फक्त QR लावून पैसे मिळणार नाहीत, त्यासाठी एक अट आहे.
आता UPI Transactions वर लागणार चार्ज? Google Pay, PhonePe, Paytm सारखे Apps ही आकारणार शुल्क?
व्यापाऱ्याने दिलेल्या तिमाहीतील तीन महिन्यांपैकी किमान दोन महिन्यांत, प्रत्येक महिन्यात किमान 25 वैध डिजिटल व्यवहार करणे आवश्यक आहे.म्हणजे 3 महिन्यांपैकी किमान 2 महिने तुम्ही प्रत्येक महिन्यात किमान 25 वेळा UPI ने पैसे घेतले पाहिजेत. आणि त्या प्रत्येक महिन्यात एकूण व्यवहार 5,000 रुपयांपेक्षा जास्त असला पाहिजे. थोडक्यात, फक्त बोर्ड लावून ठेवायचा नाही, तर तो वापरायचा पण आहे. रोज 1-2 जरी व्यवहार झाले तरी 25 आकडा सहज होईल.
लहान दुकानदारांमध्ये डिजिटल व्यवहारांची सवय लागावी आणि व्यवहारांचे प्रमाण वाढावे, यासाठी या योजनेतील 50% निधी हा केवळ व्यवहारांची संख्या वाढवण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.योजनेचा अर्धा पैसा फक्त व्यवहार वाढवण्यासाठी ठेवलाय. जर तुम्ही मागच्या 3 महिन्यांपेक्षा या 3 महिन्यात तुमचे व्यवहार किमान 5% ने वाढवले, तर तुम्हाला एकूण व्यवहाराच्या 0.03% इतके जास्तीचे पैसे मिळतील. याशिवाय, मागच्या तिमाहीपेक्षा वाढलेल्या व्यवहाराच्या रकमेवर 0.20% पर्यंत प्रोत्साहन पण मिळेल. म्हणजे जेवढा जास्त धंदा UPI वर कराल, तेवढा जास्त फायदा.
ही ‘UPI व्यापार सक्षम’ योजना मर्चंट डिस्काउंट रेट लागू झाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.ही योजना 3 वर्षं चालणार आहे. NPCI ला वाटतंय, यामुळे दरवर्षी 60 लाख ते 1 कोटी नवीन QR कोड लागतील. 5 लाख ते 10 लाख नवीन साऊंडबॉक्स बसवले जातील. यामुळे गावाकडच्या आणि छोट्या शहरातल्या दुकानदारांचा डिजिटल पेमेंटचा खर्च कमी होईल आणि त्यांचा धंदा पण वाढेल.थोडक्यात, छोट्या दुकानदाराने आता मागे राहायचं नाही. QR लावा, साऊंडबॉक्स लावा, रोज UPI ने पैसे घ्या, आणि सरकारकडून मिळणारे 300 आणि 750 रुपये पण घ्या.
Ans: छोट्या दुकानदारांना QR कोड आणि साऊंडबॉक्सच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटशी जोडण्यासाठी NPCI ने सुरू केलेली ही योजना आहे.
Ans: वार्षिक 40 लाख रुपयांपर्यंत उलाढाल असणारे छोटे व्यापारी या योजनेसाठी पात्र आहेत.
Ans: नवीन दुकानदाराने दुकानात QR कोड बसवल्यास 300 रुपयांचे प्रोत्साहन मिळण्याची तरतूद आहे.