'या' पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात दिला तब्बल 52 हजार टक्के परतावा!
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जवळपास ८४००० अंकांचा टप्पा गाठलेला मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स मागील आठवड्यात ८०००० अंकांच्या खाली घसरला होता. इतकेच काय तर चालू आठवड्याच्या सुरुवातीच्या सत्रात देखील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर मात्र २८ डिसेंबर रोजी अर्थात सोमवारी दुपारी शेअर बाजार सावरला असून, मंगळवार अर्थात आजही शेअर बाजाराने धनत्रयोदशीच्या दिवशी मोठी उसळी घेतली आहे.
अर्थात, आज धनत्रयोदशीचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम ठरला आहे. आज बाजारात काहीशी घसरण झाली. पण शेवटच्या तासांत बँकिंग समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार वाढीसह बंद झाले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही चांगली कामगिरी दिसून आली आहे.
सेन्सेक्सची 364 अंकांची उसळी
आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 364 अंकांच्या उसळीसह 80,369 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 128 अंकांच्या उसळीसह 24,466 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आता मंगळवार हा शेअर बाजारासाठी मंगलमय ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
आज बाजारात मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) 3982 समभागांपैकी 2214 समभाग वाढीसह बंद झाले आहे. तर 1643 समभाग हे तोट्यासह बंद झाले आहेत. 125 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 समभाग वाढीसह आणि 14 समभाग तोट्यासह बंद झाले आहेत.
कोणते शेअर्स राहिले तेजीत
तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) निफ्टीच्या 50 समभागांपैकी 31 समभाग वाढले आहेत. तर 19 समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या समभागांमध्ये फेडरल बँक ८.४९ टक्के, एसबीआय ५.१३ टक्के, आयसीआयसीआय बँक ५.१३ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.१८ टक्के, एनटीपीसी २.११ टक्के, बजाज फायनान्स १.६१ टक्के, लार्सन १.२५ टक्के, ॲक्सिस बँक १.३१ टक्के वाढीसह बंद झाले आहे. तर मारुती सुझुकी ४.११ टक्के, टाटा मोटर्स ४.०६ टक्के, सन फार्मा २.१४ टक्के, भारती एअरटेल १.६१ टक्के, इन्फोसिस १.२५ टक्के घसरणीसह बंद झाले आहे.
बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
आज शेअर बाजारात सर्वाधिक वाढ ही बँकिंग शेअर्सची राहिली आहे. निफ्टी बँकेत समाविष्ट असलेल्या 12 समभागांपैकी 11 वाढीसह बंद झाले आणि इंडसइंड बँकेचा फक्त एक समभाग घसरला आहे. निफ्टी बँक 1061 अंकांनी किंवा 2.07 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल व वायू क्षेत्रातील समभाग तेजीने बंद झाले आहे. तर ऑटो आयटी, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.92 टक्क्यांच्या वाढीसह आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.76 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)