...हीच संधी आहे, एकत्र या; पंतप्रधान मोदींचे आवाहन; ममता बॅनर्जी ताडकन उठून गेल्या!
सध्या जगभरात सुरु असलेले दशक हे तंत्रज्ञान, भू-राजकीय बदलांचे आहे. अशातच जगभरात सध्या अनेक संधी आहेत. या संधी ओळखून भारताने त्या अनुकूल आपले धोरण ठरवणे गरजेचे आहे. देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढावी. यासाठी भारताने त्या अनुकुल धोरण तयार करणे गरजेचे आहे. हाच भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याच्या दिशेने प्रगतीचा मार्ग आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारांची भूमिका महत्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली आज नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे की, “२०४७ पर्यंत देशाला विकसित राज्य बनवणे ही सर्व भारतीयांच्या मनातील इच्छा आहे. आणि यामध्ये राज्य सरकारे हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे. कारण ते लोकांसोबत थेट जोडले गेले आहे.”
हेही वाचा : …तुम्हीही आयटीआर भरला नाही, …होऊ शकते जेल; केवळ चार दिवस शिल्लक!
काय होता बैठकीचा उद्देश?
आज घेण्यात आलेली नीती आयोगाची बैठक ही 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेण्यात आली होती. या बैठकीचे उद्दिष्ट केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रशासनातील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे, वितरण यंत्रणा मजबूत करून ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येच्या जीवनाचा दर्जा वाढवणे हा आहे. हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
काय आहे नीती आयोग?
नीती आयोग या सर्वोच्च संस्थेमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री यांचा समावेश होतो. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या शिफारशींचाही या बैठकीत विचार करण्यात आला.
ममता बॅनर्जी बैठकीतून तडकाफडकी उठल्या
काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे अनेक पक्ष नीती आयोगास विरोध करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारत आघाडीला विरोध करण्यासाठी, आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत हजेरी लावली. मात्र, त्या बैठक मधेच सोडून निघून गेल्या. नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मला सभेत बोलण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे आपण निषेधार्थ बैठक सोडून निघून आलो.