Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Price Hike : मोठा झटका… अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! पेट्रोल ₹5 रुपयांनी तर डिझेल ₹3 रुपयांनी महाग

Petrol Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील सर्वात मोठी खाजगी इंधन विक्रेता कंपनी 'नायरा एनर्जी'ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये तर डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून हे नवीन दर लागू केलेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 03, 2026 | 02:43 PM
अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! ( सौजन्य - सोशल मीडिया )

अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव!
  • पेट्रोल ₹5 रुपयांनी तर डिझेल ₹3 रुपयांनी वाढलं
  • सरकारी तेल कंपन्यांची भिन्न भूमिका
Petrol Diesel Price Hike :  जागतिक स्तरावर सुरु असलेल्या तणावाचा फटका मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या निर्यातीवर होताना दिसतो. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती खालीवर होतच असतात. त्यामुळे सगळ्या पहिला पेट्रोल – डिझेलवर थेट प्रभाव दिसून येतो. आताही याचा मोठा झटका बसला आहे. कारण पेट्रोल डिझेलच्या किमती अचानक वाढल्या आहेत. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल तब्बल 3 रुपयांनी वाढलं आहे. मग नेमके आजच्या किमती काय आहे? ( Petrol Diesel Price Hike ) 

UPI Payment Decline : MDR चार्जेसचा घेतला धस्का? लागू होण्यापूर्वीच UPI पेमेंटमध्ये घट! मग 15 ऑक्टोबरपासून काय होणार?

देशातील अग्रगण्य खाजगी इंधन विक्रेता असलेल्या नायरा एनर्जीने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. हे नवीन दर शनिवारी तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल प्रति लिटर १००.७१ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ९१.३१ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय तेल किमतींचा परिणाम

नायराचा हा निर्णय जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील तीव्र चढ-उतारांच्या काळात घेतला गेला आहे. अहवालानुसार, कंपनी वाढत्या आंतरराष्ट्रीय किमती आणि देशांतर्गत विक्री किमतींमधील तफावत भरून काढण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. त्यामुळे, वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम शुद्धीकरण आणि इंधन विक्री खर्चावर होतो.

शेवटची दरवाढ कधी झाली होती?

नायरा एनर्जीने यापूर्वी मार्च २०२६ मध्ये पेट्रोलच्या दरात ₹५ आणि डिझेलच्या दरात ₹३ प्रति लिटरने वाढ केली होती. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्याने, कंपनीने १ जुलैला पेट्रोलच्या दरात ₹५ आणि डिझेलच्या दरात ₹३ प्रति लिटरने केली आहे.

सरकारी तेल कंपन्यांची भिन्न भूमिका

सध्या, सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ इंधन किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असूनही, देशांतर्गत इंधन किमतींबाबत सरकारी आणि खाजगी कंपन्यांची धोरणे भिन्न असल्याचे दिसून येते.

राज्यानुसार किमतीत बदल

स्थानिक कर, व्हॅट आणि इतर शुल्कांमुळे नायरा दरवाढीचा परिणाम राज्यानुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे, प्रति लिटर ₹५ ची मूळ वाढ होऊनही, ग्राहकांना मिळणारी अंतिम किंमत राज्यानुसार बदलू शकते.

सर्वसामान्यांचा खर्च वाढेल का?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनचालकांवरच होणार नाही. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढू शकतो, ज्यामुळे मालवाहतूक आणि काही विशिष्ट वस्तूंच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

Web Title: Petrol price hike by 5 rupees and diesel by 3 rupees marathi news ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • petrol diesel
  • Price Hike

संबंधित बातम्या

Price Hike October 2026 : एका झटक्यात वाढले ‘या’ वस्तूंचे भाव; ऑक्टोबर महिन्यात काय-काय महागले? जाणून घ्या लिस्ट
1

Price Hike October 2026 : एका झटक्यात वाढले ‘या’ वस्तूंचे भाव; ऑक्टोबर महिन्यात काय-काय महागले? जाणून घ्या लिस्ट

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

Price Hike : सणासुदीच्या तोंडावर पुन्हा झटका! वर्षात सलग तिसऱ्यांदा दरवाढ; 1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार!
3

Price Hike : सणासुदीच्या तोंडावर पुन्हा झटका! वर्षात सलग तिसऱ्यांदा दरवाढ; 1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.