पीएफची पेन्शन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!
आजवर पेन्शनधारकांसाठी दर महिन्याला पेन्शन मिळण्यासाठी काही मोजक्या बँकाच ओळखल्या जात होत्या. यामुळे ठराविक तारखेला या बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. आता केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएफची पेन्शन आता काही महिन्यांनी कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत घेता येणार आहे.
१ जानेवारी २०२५ पासून लागू होणार नवीन बदल
पीएफची पेन्शन आली की ज्येष्ठ नागरिकांना बॅंकांमध्ये तासनतास थांबावे लागते. यात पुन्हा बँकांचे लंच टाईम, हीच कागदपत्रे आणा. ज्यात अनेक खेपा व्हायच्या. त्या वाचणार आहेत. पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत त्यांचे खाते खोलून त्यात पेन्शन घेऊ शकणार आहेत. रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची माहिती
केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) कडून कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) 1995 चा प्रस्ताव प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित करण्यात आले होते. ही नवीन प्रणाली आल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार आहे. यामुळे ईपीएफओच्या 78 लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) ची मान्यता हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
काय होता नेमका प्रस्ताव
रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमकडून कर्मचारी पेन्शन योजना 1995 चा प्रस्ताव प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित करण्यात आले होते.
खासगी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार
ही नवीन प्रणाली आल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार आहे. यामुळे ईपीएफओच्या 78 लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) ची मान्यता हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. असे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.






