फोटो सौजन्य AI
अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, अन्न व स्वाती भारडे यांनी या प्रकरणी एफआयआर औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक दाखल केली. त्यांना २० जून रोजी स्वीडनचे नागरिक टॉमी ब्लोमक्विस्ट यांच्याकडून ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदाराने इंडियामार्टच्या माध्यमातून मेसर्स स्कायलाइन इम्पेक्स या फर्मकडून औषधांच्या वायल्स खरेदी केल्या होत्या. मात्र, तपासणीदरम्यान या औषधांचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. त्यानंतर विभागाने तपास सुरू केला.
Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
तक्रारीच्या आधारे औषध प्रशासन विभागाने संबंधित औषधांची तपासणी करून काही नमुने जप्त केले. हे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात जप्त केलेली औषधे बनावट (स्प्यूरियस) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, याच फर्ममधील अन्य भागीदार कीतीं सुनील कल्याणी यांनाही उच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी एका फौजदारी अर्जात अंतरिम दिलासा दिला आहे. यश बेरी हे देखील त्याच फर्मचे भागीदार असल्याने समानतेच्या तत्वावर त्यांनाही अंतरिम संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती केली. न्यायालयाने हा युक्तिवाद विचारात घेत अंतरिम दिलासा मंजूर केला.
उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हा अर्ज सहआरोपीच्या अर्जासोबत सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश दिले. जरीपटका पोलिसांनी याचिकाकर्त्याला अटक केल्यास २५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा सक्षम जामीनदार सादर केल्यानंतर त्याला अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपीला दर रविवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तपास अधिका-यांनी चौकशीसाठी बोलावल्यास उपस्थित राहणे, तपासात सहकार्य करणे आणि अभियोजन पक्षाच्या पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.






