Business Ideas : यंदाच्या दिवाळीत कमी भांडवलात करा 'हे' व्यवसाय; अल्पावधीतच होईल बक्कळ कमाई!
आपल्या देशात हंगामी व्यवसायांना खुप महत्व आहे. अनेक जण हंगामी व्यवसायांमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील करत असतात. अशातच आता दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर आज आपण दिवाळीच्या कालावधीत असे कोणते व्यवसाय आहेत. जे केल्याने तुम्हांला मोठी कमाई होणार आहेत. याबाबत जाणून घेणार आहोत…
सध्याच्या घडीला अनेकजण छोटी-मोठी नोकरी करत असतात. त्यामुळे अनेकांनी आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नोकरीसोबतच दुय्यम पार्ट टाईम काम करावे लागते. त्यामुळे आता तुम्ही देखील दिवाळीच्या काळात पार्ट टाईम काम करण्याचा विचार करत असाल तर पुढील तीन व्यवसाय हे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. दिवाळीच्या सणामध्ये मातीचे दिवे, पुजेचे सामान, मुर्ती-मेणबत्ती-अगरबत्ती आणि फटाक्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही ही साधने विक्री करण्याचा व्यवसाय करु शकतात.
(फोटो सौजन्य – istock)
पुजेचे सामान – तसे पाहिल्यास भारतात धार्मिक पुजेच्या सामानाला वर्षभर मागणी असते. मात्र, सणासुदीच्या काळात विशेषत दिवाळीमध्ये लक्ष्मीपुजनाच्या पार्श्वभुमीवर पुजेच्या सामानाची मागणी आणखीनच वाढते. यामध्ये प्रामुख्याने आगरबत्ती, धुप, दिवे, वाती, होम-हवनाचे सामान यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय केवळ ५ ते ७ हजार रुपयांच्या गुंतवणूकीतून या वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय सुरु करु शकतात. त्यातून तुम्हांला नक्कीच मोठी कमाई होईल.
मातीचे दिवे – दिवाळीत प्रत्येकाच्या घरात मातीचे दिवे लावले जातात. याशिवाय गेल्या काही वर्षांत डिझायनर दिव्यांची मागणीही वाढली आहे. विशेष म्हणजे हे दिवे खूप स्वस्तही असतात. ज्यांची दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. आपण इच्छित असल्यास, आपण दिवा निर्मात्यांशी संपर्क साधू शकतात. आणि आपल्या डिझाइनचे दिवे मिळवू शकतात. याशिवाय हे दिवे आता मशिनच्या साहाह्याने देखील बनवले जात आहेत. त्यांची ऑनलाइन विक्री देखील केली जाऊ शकते.
हे देखील वाचा – अवघ्या सहा हजार रूपयांपासून सुरु केला बिझनेस; आज 5 कोटींच्या कंपनीचा आहे मालक!
मुर्ती आणि मेणबत्त्या – दिवाळीच्या काळात प्रत्येक घरात लक्ष्मी, गणेश आणि धनाचा देव कुबेर यांच्या मूर्ती आणून त्यांची पूजा केली जाते. तसेच संपूर्ण घर विविध प्रकारच्या दिव्यांनी उजळून निघते. या मूर्तीं विक्रीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. याशिवाय डिझायनर मेणबत्त्या आणि दिव्यांचा व्यवसायातून ही तुम्हांला मोठी कमाई होऊ शकते.