माय-लेकीची कमाल..! 5000 रुपये भांडवलात सुरु केला व्यवसाय; महिन्याला होतीये लाखोंची कमाई!
मागील काही काळापासून देशभरात स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणाच वाढत आहे. अनेकजण आपल्या शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्यावर भर देत आहे. आज आपण अशाच एका माय-लेकीच्या व्यवसायाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ ५००० रुपये गुंतवणूकीतून व्यवसाय सुरु केला होता. त्यांचा हा व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणात बहरला असून, त्या महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.
२०१७ साली व्यवसायाची सुरुवात
एस हरिप्रिया असे या यशस्वी उद्योजिकेचे नाव असून, तिने आपली आई एस. बानू यांना सोबत घेऊन आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. माय-लेकींची ही कंपनी आज त्यांना महिना लाखोंची कमाई करुन देत आहे. एस हरिप्रिया यांना २०१७ साली आपल्या मुलांना खेळणी खरेदी करण्यासाठी मोठी अडचण आली. तेव्हा त्यांना लक्षात आले की त्या एकट्याच नाही तर अनेक महिलांना आपल्या मुलांसाठी खेळणी खरेदी करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे त्यांनी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – अवघ्या सहा हजार रूपयांपासून सुरु केला बिझनेस; आज 5 कोटींच्या कंपनीचा आहे मालक!
जोडलेत ५ लाखांहून अधिक ग्राहक
एस हरिप्रिया यांनी तामिळनाडू येथील कोईंबतूर येथील आपल्या छोट्याशा घरातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. मात्र, त्यासाठी त्यांनी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्या आज आपल्या व्यवसायातून तब्बल ५०० हून अधिक प्रकारची खेळणी बनवण्यात यशस्वी झाल्या असून, देशभरात त्यांनी जवळपास ५ लाखांहून अधिक ग्राहक आपल्यासोबत जोडले आहेत.
किती होते महिन्याला कमाई
उद्योजिका एस हरिप्रिया यांनी तामिळनाडूतील कोईंबतूर येथून छोट्याशा घरातून व्यवसाय सुरु करत आज आपला व्यवसाय एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्या या व्यवसायासाठी केवळ ५००० रुपये इतके भांडवल गुंतवले होते. त्यांनी प्रामुख्याने मुलांच्या मेंदुचा विकास होईल, अशी खेळणी बनवायला सुरुवात केली. ज्यामुळे शिक्षित वर्गातून त्यांना प्रचंड मागणी मिळत गेली. त्यांनी आपल्या स्टार्टअपला एक्स्ट्रोकिड्स असे नाव दिले आहे. त्या त्यातून महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.