2 डिसेंबरला खुला होणार हा आयपीओ; वाचा... किती आहे किंमत पट्टा, सेबीकडे ऑफर दस्तावेज सादर!
देशात लघु आणि मध्यम रियल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणून सर्वप्रथम नोंदणी झालेल्या प्रॉपर्टी शेअर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (पीएसआयटी) संस्थेने आयपीओच्या माध्यमातून प्रॉपर्टी शेअर प्लॅटिना अंतर्गत 353 रुपये कोटी भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ ऑफर दस्तावेज सादर केला आहे. प्रॉपर्टी शेअर प्लॅटिना ही पीएसआयटी आणि भारताच्या लघु व मध्यम रियल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्टकडून सादर करण्यात आलेली पहिलीच योजना आहे.
आयपीओ गुंतवणुकीअंतर्गत ऑफर करण्यात आलेल्या प्रत्येक युनिटसाठी प्राईस बँड रु. 10 लाख ते रु. 10.5 लाख दरम्यान ठरवण्यात आला आहे. आयपीओ गुंतवणूक येत्या 2 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल. इच्छुक गुंतवणूकदार किमान 1 युनिटसाठी गुंतवणूक करु शकणार आहेत.
प्लॅटिना युनिटसचा आयपीओ इश्यू पूर्णपणे फ्रेश इश्यू असून यात ऑफर फॉर सेलचा समावेश नाही. या इश्यूमधून उभी होणारी रक्कम प्रेस्टिज टेक प्लॅटिना एसपीव्ही (स्पेशल परपझ व्हेईकल) द्वारा प्रेस्टीज टेक प्लॅटिनाची मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच काही रक्कम अन्य सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
हे देखील वाचा – भारतात बी२बी प्रभावासाठी व्हिडिओ सर्वात लक्षवेधक, विश्वसनीय फॉर्मेट – लिंक्डइन
बँगलोर शहराच्या आउटर रींग रोड (ओआरआर) येथील प्रेस्टीज टेक प्लॅटिनाच्या लीड गोल्ड ऑफीस इमारतीत प्रॉपशेअर प्लॅटिनाची 246,935 चौरस फूट मालमत्ता आहे. अमेरिकेतील एका टेक कंपनीला ही जागा 9 वर्षांच्या लीजवर भाड्याने देण्यात येणार आहे. ही संपूर्ण इमारत प्रेस्टीज ग्रुपकडून विकसित करण्यात आली आहे. भाडे करारात 4.6 वर्षांच्या लॉक इन कालावधी असून दर तीन वर्षानंतर भाडे दरात वाढ करण्याची तरतूद आहे. यामुळे गुंतवणूकदारांना 2026 वित्तीय वर्षात वार्षिक 9 टक्के दराने व्याज मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच 2027 साली हे व्याज 8.7 टक्के तर 2028 साली हे व्याज 8.6 टक्के असेल असे प्रस्तावित आहे.
प्रॉपर्टी शेअर प्लॅटिना प्रस्तावित आयपीओसाठी प्रॉपशेअर इनव्हेस्टमेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड (प्रॉपशेअर अथवा आयएम) कंपनीने सर्व वार्षिक व्यवस्थापन खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी व प्रॉपर्टी मॅनेजमेंट फी या शुल्कमाफीचाही समावेश आहे. वित्तीय वर्ष 25 व वित्तीय वर्ष 26 साठी ही कंपनी व्यवस्थापन शुल्क माफ करणार आहे. तर 2027 वित्तीय वर्षात केवळ ०.25 टक्का इतके मामुली शुल्क आकारणार आहे. तर वित्तीय वर्ष 2028 पासून ही कंपनी 0.30 टक्का शुल्क आकारणार आहे. प्रॉपर्टी शेअर इश्यूपैकी किमान 5 टक्के रककम योजनेतील युनिटमध्येच गुंतवणार आहे.
हे देखील वाचा – एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; उद्योग जगतावर शोककळा!
ऑफरसाठी लीड मॅनेजर म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी काम पाहाणार आहे. तसेच सीरील अमरचंद मंगलदास ही कंपनी प्रॉपर्टी शेअर इनव्हेस्टमेंट ट्रस्टची इंडियन लीगल काउंसेल व प्रॉपशेअर प्लॅटिनासाठी इनव्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून काम पाहाणार आहे. तसेच इश्यू रजिस्ट्रार म्हणून केफिन टेक्नालॉजिज लिमिटेड ही कंपनी काम पाहाणार आहे. त्याचप्रमाणे इश्यूसाठी ट्रस्टीचे काम ॲक्सिस ट्रस्टी सव्हिसेस ही कंपनी काम पाहाणार आहे. तसेच इश्यू ऑफरचे इनव्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून प्रॉपशेअर इनव्हेस्टमेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम पाहाणार आहे. कंपनीचे युनिटस मुंबई शेअरबाजारात (बीएसई) सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.
प्रॉपर्टी शेअरचे संचालक, कुनाल मोकटन या बाबत म्हणाले आहे की, “प्रॉपशेअर प्लॅटिनाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक पर्यायी गुंतवणूक मालमत्ता उपलब्ध झाली आहे जी त्यांना नियमित भाड्याच्या रुपाने परतावा मिळवून देणार आहे. त्याचवेळी संबंधित मालमत्तेमुळे त्यांच्या भांडवलात वाढदेखील होत राहणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. अशी गुंतवणूक मालमत्ता वित्तीय बाजारात सादर करणारे आम्ही पहिलेच ठरलो आहोत याचाही मला सार्थ अभिमान आहे.”