एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; उद्योग जगतावर शोककळा!
एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने एस्सार समूहासह संपूर्ण उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींच्या माहितीनुसार, त्यांनी अखेरच्या रात्री म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
शशी रुईया यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी रुईया हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. दुपारी चारच्या सुमारास रुईया हाऊस येथून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बाणगंगा स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शशी रुईया यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ते दूरदर्शी नेतृत्व असलेले एक महान व्यक्ती होते ज्यांनी भारताचे व्यावसायिक परिदृश्य बदलले. त्यांच्या निधनाने खूप दुःख झाले.”
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
Shri Shashikant Ruia Ji was a colossal figure in the world of industry. His visionary leadership and unwavering commitment to excellence transformed the business landscape of India. He also set high benchmarks for innovation and growth. He was always full of ideas, always… pic.twitter.com/2Dwb2TdyG9
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2024
काय करतो एस्सार ग्रुप
उद्योगपती शशी रुईया यांनी 1965 मध्ये उद्योग जगतात प्रवेश केल. त्यांचे वडील नंद किशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1969 मध्ये त्यांचा भाऊ रवी रुईया यांच्यासोबत एस्सारची स्थापना केली. पोलाद, ऊर्जा, शिपिंग, बंदरे अशा विविध क्षेत्रात हा गट काम करतो. एस्सार ग्रुपच्या वेबसाइटनुसार, फंडाच्या पोर्टफोलिओ कंपन्यांनी एकत्रितपणे 14 अब्ज डॉलर कमाई केली आहे.
2.2 अब्ज डॉलर निव्वळ संपत्ती
फोर्ब्सनुसार, रुईया ब्रदर्स म्हणजेच शशी रुईया आणि रवी रुईया यांची एकूण संपत्ती २.२ अब्ज डॉलर (सुमारे १८,३०४ कोटी रुपये) आहे. शशी रुईया यांच्या नेतृत्व क्षमता आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे एस्सार समूहाला भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळाले. एस्सार समूहाच्या स्थापनेनंतर ते बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सक्रिय झाले. नंतर, समूहाचा विस्तार तेल आणि वायू, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्येही झाला.