Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले…

एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी भारतातील कामगारांनी आठवड्याला 90 तास काम करावे असा सल्ला दिला होता. आता यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी आपले विचार मांडले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2025 | 09:12 PM
90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले...

90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

देशातील अग्रगण्य कंपनी L&T चे चेअरमेन एस एन सुब्रमण्यम यांनी एक विधान केले होते. ज्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. खरंतर, सुब्रमण्यम यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला ९० तास काम करावे. याशिवाय त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे.

त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आता विविध क्षेत्रातील दिग्गजही या विधानावर आपले मत देत आहेत. आता बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनीही यावर आपले विचार मांडले आहे. चला, ९० तासांच्या कामाच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

राजीव बजाज यांचे 90 तास काम करण्यावर काय विचार?

शुक्रवारी CNBC-TV18 शी बोलताना, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले की, जर तुम्हाला 90 तासांच्या कामाचा ट्रेंड सुरू करायचा असेल तर तो सिस्टमच्या वरच्या थरापासून सुरू झाला पाहिजे. याशिवाय राजीव बजाज म्हणाले की, तुम्ही किती तास काम करता हे महत्त्वाचे नाही. त्याऐवजी, तुम्ही तुमचे काम किती चांगले करता हे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ते म्हणाले, “आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक दयाळू आणि सौम्य जगाची आवश्यकता आहे.”

राजीव बजाज यांच्या विधानाचे होत आहे कौतुक

एकीकडे सोशल मीडियावर एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांच्या विधानाचा जोरदार विरोध होताना दिसत आहे. दुसरीकडे, लोक राजीव बजाज यांच्या विधानाचे कौतुक करत आहेत. याआधी इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनीही म्हटले होते की तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे. यानंतर नारायण मूर्ती यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.

कोणत्या देशांचे लोक सर्वात जास्त तास काम करतात?

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या देशांच्या यादीत आपले स्थान बनवून आहे, जिथे सरासरी आठवड्यात ५०.३ तास ​​काम केले जाते. या यादीत UAE (५०.९ तास) सर्वात वर आहे. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे लोक ४९.९ तास काम करतात.

जास्त काम केल्याचे दुष्परिणाम

संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अलिकडच्या अहवालांनी जगाला जास्त वेळ काम करण्याच्या गंभीर परिणामांबद्दल इशारा दिला आहे. अहवालांनुसार, जास्त काम केल्याने केवळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2016 मध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे 19 लाख मृत्यू झाले.

Web Title: Rajeev bajaj has shared their views on working 90 hours formula of s n subramanyam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • Business News
  • office work

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.