
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रीय वधूच्या स्वप्नाला राजेशाही स्पर्श देण्यासाठी ‘इंद्रिया’ आणि आदित्य बिर्ला ज्वेलरी यांनी एकत्र येत “राजश्री” (Rajashree New Collection) हे खास ब्रायडल कलेक्शन सादर केले आहे. महाराष्ट्राचा वारसा, परंपरा आणि संस्कृती यांचा अभिमानाने साजरा करणारे हे कलेक्शन प्रत्येक वधूला तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात खास दिवशी पारंपरिक आणि सांस्कृतिक सौंदर्याची अनुभूती देणारं आहे.
राजश्री कलेक्शनची ओळख म्हणजे त्यातील तीन नाजूक स्तर: वज्रटिक हार, चंपली हार आणि साज हार. वज्रटिक हारातील सोन्याचा दिमाखदार आकार आणि चंद्रकोर तिलक शिंदेशाहीचा गौरव पुन्हा उजाळतो. चंपली हारात हिरव्या खड्यांनी सजलेले चमेलीच्या पाकळ्यांचे डिझाइन आणि मध्यभागी लक्ष्मी पेंडंट आहे. तर साज हार भक्ती, श्रद्धा आणि वारशाचं प्रतीक असून त्यात विष्णूचे दहा अवतार सुबकपणे कोरलेले आहेत.
राजश्री कलेक्शन हे केवळ दागिन्यांचे नव्हे, तर महाराष्ट्राच्या वारशाचे प्रतीक आहे. मराठी आणि हिंदी भाषेत लाँच झालेल्या राजश्री ब्रँड फिल्म मध्ये या कलेक्शनमागची भावना आणि परंपरेचं सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. ही फिल्म सर्व टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. देशभरातील ३६ राज्यांमध्ये कार्यरत असलेला इंद्रिया ब्रँड आता या अप्रतिम कलेक्शनद्वारे प्रत्येक वधूच्या जवळ परंपरेचा साज पोहोचवणार आहे.
इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी सांगितलं की, ‘राजश्रीच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक प्रतीकं आणि परंपरांसह इंद्रियाचे महाराष्ट्राशी असलेले नाते मजबूत करत आहोत. राज्याचा श्रीमंत वारसा आणि राजेशाही कलेपासून प्रेरित डिझाइन्स आम्ही या कलेक्शनमधे समाविष्ट करण्यात आली आहेत. महाराष्ट्रीय वधूसाठी अस्सल, अर्थपूर्ण, डिझाइन्स तयार करत प्रादेशिक ब्रायडल दागिने क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. राजश्री कलेक्शनद्वारे हे भारतात ब्रायडल दागिन्यांसाठी सर्वात विश्वासार्ह ब्रँड अशी इंद्रियाची ओळख तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’
इंद्रियाचे डिझाइन प्रमुख अभिषेक रस्तोगी म्हणाले, ‘आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती डिझाइनमधून मांडायची होती. राजश्री कलेक्शन पारंपरिक व आधुनिक कारागिरीचा आकर्षक नमुना आहे. प्रसिद्ध चंद्रकोर तिलक, चमेलीचे मोतिफ्स, अव्हेंच्युरिन स्टोन्स, नाजूक मणी यांनी सजलेले दागिने केवळ सौंदर्यच नव्हे तर वारसा, भावना आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. कलेक्शनमधील प्रत्येक दागिना महाराष्ट्रीय वधूची सांस्कृतिक पसंती दर्शवणारा आहे.’
कारागिरी इतकी अप्रतिम, की मन म्हणेल – “दिल अभी भरा नहीं…”