BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी (Photo Credit - X)
नवी दिल्ली: इंडियन मल्टी-नॅशनल कॉर्पोरेशन आणि सरकारी व नागरिकांसाठी जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगी असलेल्या बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लिमिटेड (BLS International Services Ltd.) ने ३० सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत पुन्हा एकदा आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवत जागतिक स्तरावर मजबूत उपस्थिती दर्शविली आहे.
या तिमाहीत बीएलएस इंटरनॅशनलने अनेक महत्त्वाचे करार संपादन केले, ज्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे:
बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल यांनी या निकालांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्हिसा व कॉन्सुलर सेवा आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमधील सततच्या गतीमुळे ही कामगिरी साधली आहे.
| तपशील (कोटी रूपये) | आ.व. २६ ची दुसरी तिमाही | आ.व. २५ ची दुसरी तिमाही | वार्षिक वाढ |
| कार्यसंचालनांमधून महसूल | ७३६.३ | ४९५.० | ४८.८ % |
| ईबीआयटीडीए | २१२.८ | १६४.० | २९.७ % |
| करोत्तर नफा (PAT) | १८५.७ | १४५.७ | २७.४ % |
| ईबीआयटीडीए मार्जिन | २८.९ % | ३३.१ % | – |
| पीएटी मार्जिन | २५.२ % | २९.४ % | – |
इतर महत्त्वपूर्ण बाबी:
१) व्हिसा व कॉन्सुलर व्यवसाय (एकूण महसूलात ६२% योगदान)
२) डिजिटल व्यवसाय (एकूण महसूलात ३८% योगदान)






