फोटो सौजन्य - Social Media
पवनने नेहमीच अभ्यासात हुशार होता. त्याने IIT खरगपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने सॅमसंग या बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी केली. चांगले पॅकेज, उत्तम सुविधा असूनही कॉर्पोरेट जगात काहीतरी कमी वाटत होते. त्याला काहीतरी हटके करायचे होते. पवन आणि त्यांचे मित्र अरविंद सांका यां दोघांनी मिळून ‘TheKarrier’ नावाचं एक लॉजिस्टिक स्टार्टअप सुरू केलं. उद्दिष्ट होतं लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवणं. पण हे स्टार्टअप फार काळ टिकू शकलं नाही आणि लवकरच थांबावं लागलं. तरी धीर खचू न देता पवनने प्रयत्न तसेच ठेवले.
2014 मध्ये त्यांनी ‘रॅपिडो’ या बाइक-टॅक्सी स्टार्टअपची सुरुवात केली. दोनचाकी वाहनांची टॅक्सी सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. पण सुरुवातीला कोणताही गुंतवणूकदार तयार नव्हता. 75 पेक्षा अधिक वेळा पवनला नकार मिळाले. काहींनी उबर आणि ओलासारख्या मोठ्या ब्रँडशी स्पर्धा अशक्य असल्याचं सांगितलं, तर काहींनी ट्रॅफिक व नियमांचं कारण दिलं. पण पवन हार मानले नाही. त्याने 15 रुपये बेस फेअर आणि 3 रुपये प्रति किमी अशा स्वस्त दरात सेवा सुरू केली.
अॅप वापरण्यास सोपं होतं आणि राइडर्स सुद्धा सहकार्यशील होते. हळूहळू ग्राहक वाढू लागले. 2016 मध्ये पवनची मेहनत फळास आली. हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी रॅपिडोमध्ये गुंतवणूक केली. या मुळे ना केवळ फंडिंग मिळालं, तर व्यावसायिक मान्यताही मिळाली. त्यानंतर अनेक गुंतवणूकदार आले आणि कंपनी वेगाने वाढली.
आज रॅपिडो फक्त बाइक-टॅक्सी सेवा नाही, तर ई-बाईक, ऑटो आणि लॉजिस्टिक क्षेत्रातही सक्रिय आहे. 100 हून अधिक शहरांमध्ये रॅपिडो कार्यरत आहे आणि लाखो लोक रोज याचा वापर करतात. कंपनीची एकूण बाजारमूल्य (valuation) 6,700 कोटी रुपयांहून अधिक आहे आणि ती भारतातील आघाडीच्या मोबिलिटी स्टार्टअप्सपैकी एक मानली जाते.